क्रांतिकारकांच्या वारसदारांनी एका झेंड्याखाली यावे – कैलास सारोकते

अकोले प्रतिनिधी
आदिवासी क्रांतिकारकांच्या वारसदारांनी एका झेंड्याखाली यावे असे आवाहन अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे व्हाईस चेअरमन कैलास सारोकते यांनी केले क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या अभिवादन सभेत संबंधित करताना ते बोलत होते
आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अकोल्यात अभिवादन सभा घेण्यात आली आदिवासी सांस्कृतिक भवन शिवाजीनगर, धुमाळवाडी, ता अकोले जि अहमदनगर येथे घेण्यात आली. यावेळी अभिवादन सभेस समाज बांधव उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रास्ताविक विकास साबळे सर यांनी केले . अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे व्हाईस चेअरमन कैलास सरोकते यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला
आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण अर्पण करून शहिद स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले
कैलास सारोक्ते पुढे म्हणाले की जल ,जंगल ,जमीन हा आपल्या आदिवासी क्रातिकारकांचा लढा तसाच पुढे नेऊया, शैक्षणिक क्षेत्रात अनुकूल बदल होत आहे. समाज सुशिक्षित व्हावा यासाठी प्रयत्न करावे, नुकत्याच विविध स्पर्धा परीक्षंचा निकाल लागला आहे यात आदिवासी तरूण ,तरूणींनी चांगले यश संपादन केले त्यांचे कौतुक त्यांनी केले इतरांनी त्यांची प्रेरणा घ्यावी जास्तीत जास्त आधिकारी कसे निर्माण होतील यासाठी प्रयत्न करत रहावे. आपण आदिवासी क्रातिकारकांच्या बंडाचे, विचारांचे वारसदार आहोत. सामाजिक लढ्यासाठी सर्वांनी एका झेंड्याखाली एकत्र यावे. असे आवाहन श्री कैलास सारोक्ते यांनी केले
आदिवासी समाजाची अवस्था बदलण्यासाठी, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील बदल घडवण्यासाठी सुशिक्षित वर्गाने पुढे येऊन समाज व समाजातील तरूण पिढी सुशिक्षित करण्यासाठी क्रांतीकारकांचे विचार, इतिहास जपावा व पुढे न्यावा आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांनी त्र्यंबकेश्वर ते भीमाशंकर या सह्याद्रीतील एक लाख अठ्ठावीस हजार हेक्टर जमीन आदिवासी समाजाला मिळवून दिली त्यामुळेच ते आदिवासी समाजासाठी प्रेरणास्थान, दैवत आहेत. असे यावेळी धर्मा दिघे यांनी सांगीतले.
आदिराज भांगरे यावेळी बोलताना म्हणाले की विविध संघटना आपापल्या परीने सामाजिक काम करत असतात. सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी सर्वांनी एकत्रित मिळुन लढा द्यावा तरच आदिवासी समाजाचे प्रश्न सुटतील.
बिरसा दिघे,अवनी दिघे, गौरी दिघे,पियुष दिघे, माधव असवले , विजय साबळे , भास्कर दिघे ,,विकास साबळे ,संजय गोडे , पथवे मेजर , प्रशांत गवारी ,संतोष गोडे ,आदिराज भांगरे , ऋषिकेश दिघे, शिवाजी दिघे , बुधाजी बुळे ,बबन बांबेरे , बांडे सर . आदी उपस्थित होते