नेवाशातील महालक्ष्मी हिवरे गावात गौतमी पाटील कोमल पाटोळे येणार!

नेवासा प्रतिनिधी
अहमदनगर जिल्ह्यातील महालक्ष्मी हिवरे (ता. नेवासा) येथे श्री खंडोबा देवस्थान यात्रा निमित्ताने महालक्ष्मीहिवरे गावचे यात्रा कमिटीचे वतीने दि. 12/12/2023 ते 19/12/2023 रोजी पर्यंत विविध करमणूक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या कार्यक्रमासाठी सध्या महाराष्ट्रात गाजत असलेली प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील व कोमल पाटील येत आहे
1) दि. 14/12/2023 ते 18/12/2023 रोजी रात्री 8 वा ते 10. वा पर्यत देवाचा छबीना
2) दि. 15/12/2023 रोजी रात्री 8 वाजता चैञाली पाटील यांचा आर्केस्ट्रा
3) दि. 16/12/2023 रोजी रात्री 8 वा कोमल पाटोळे यांचा आर्केस्ट्रा
4) दि. 17/12/2023 रोजी रात्री 8 वाजता गौतमी पाटील यांचा आर्केस्ट्रा
5) दि. 18/12/2023 रोजी रात्री सविता राणी पुणेकर यांचा तमाशा असा मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे
महालक्ष्मीहिवरे ता. नेवासा येथे दिनांक 14/12/2023 ते 18/12/203 रोजी पर्यत होणाऱ्या खंडोबा यात्रा उत्सवाचा परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे