नेट पात्रता परीक्षेत कौस्तुभ काकडेचे ९५ % गुण मिळवत घवघवीत यश

आ.निलेश लंके यांनी कौतुक करत कौस्तुभला केले सन्मानित
दत्ताठुबे /पारनेर प्रतिनिधी :
सामान्य कुटुंबातील विद्यार्थी सुद्धा आपल्या अंगी असणाऱ्या कलागुणांच्या बळावर शैक्षणिक क्रांती करू शकतो . व आपल्या मायभूमीचे नाव उज्वल करू शकतो . फक्त त्याला एक व्यासपीठ मिळावे व प्रत्येक सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांनी आपल्या बुद्धंकाच्या बळावर आपल्या मतदार संघाचे नाव मोठे करावे . हा मानस ठेवत शैक्षणिक कार्याला प्रोत्साहन देणारे पारनेर नगर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके हे नेहमी प्रयत्नशील असतात . मतदार संघातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातीलही अनेक गरीब व हुशार विद्यार्थ्यांना मदत करण्यात नेहमीच कार्यशील असणारे आमदार लंके यांनी आपल्या मतदार संघात निघोज व कान्हूरपठार येथे दोन कोटी रुपयाची अद्यावत अशी अभ्यासिका उभारली असून , त्याचा लाभ अनेक होतकरू विद्यार्थ्यांना होणार आहे.माझा गरीब कुटुंबातील विद्यार्थी हा महाराष्ट्रात नव्हे तर देशातील राजपत्रित अधिकारी म्हणून IAS – IPS सारख्या परीक्षेत नाविन्यपूर्ण यश संपादित करणार ही खात्री देत नेहमीच शैक्षणिक कार्य करत आले आहे .
महाविद्यालय प्रोफेसर पदासाठी यूजीसी मार्फत घेण्यात येणारी Net पात्रता परीक्षा कौस्तुभ काकडे हा ९५ % गुण प्राप्त करून यूजीसीच्या गुणवत्ता यादीत चमकला आहे .कोरोना काळानंतर प्रथमच जून २०२२ मध्ये केंद्र शासनामार्फत घेण्यात आलेल्या नेट परीक्षेत पारनेर नगर मतदार संघातील कु.कौस्तुभ अंबादास काकडे याने नेत्रदिपक यश संपादन केले आहे.कौस्तुभ हा नुकताच एम.कॉम उत्तीर्ण झाला आहे .
कोरोनामुळे यू .जी .सी . ने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार त्याला लगेच परीक्षा देण्याची संधी मिळाली त्यामुळे विद्यार्थी दशेतच त्याला नेट उत्तीर्ण होण्याचा मान मिळाला आहे.तो सध्या सी .ए . फायनल परीक्षेची तयारी करत असल्यामुळे या अभ्यासाचा त्याला फायदा झाला आहे .
त्याच्या यशाबद्दल पारनेर विधानसभा सदस्य,आमदार निलेश लंके यांनी त्याचे अभिनंदन केले आहे .पारनेर येथील जनसंपर्क कार्यालयात त्याला आमंत्रित करत त्याचा यथोचित सन्मान केला . व पारनेर तालुक्याचे नाव हे देशभर पसरविण्यासाठी तू योगदान देणार ही मला खात्री आहे असे म्हणत त्याच्या शैक्षणिक कार्याचे कौतुक केले . व त्याला भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या .
त्याच बरोबर जिल्हा शिक्षणाधिकारी ( माध्य ) अशोक कडूस साहेब , पुणे जि .प. शिक्षणाधिकारी गुंजाळ साहेब , गटशिक्षणाधिकारी बुगेसाहेब ,शिक्षक नेते विजय काकडे ,संजय रेपाळे,अंबादास नरसाळे,भाऊसाहेब साठे , शंभू दुधाडे , रोहिदास वाबळे ,गोकूळ कळमकर,दादाभाऊ कोल्हे ,सुनिल दुधाडे , चंदू मोढवे , बाळू खिलारी आणि पारनेर शहर रहिवाशी शिक्षक भास्कर औटी ,बाबा औटी ,बबन आढाव ,नामदेव शेरकर, शिवाजी औटी . युवराज हिलाळ, सचिन शिंदे ,बाळासाहेब ठाणगे अशोक गाडगे यांनी त्याचे कौतुक केले आहे .
पहिल्याच प्रयत्नात इतके घवघवीत यश मिळवल्याबद्दल पारनेर परिसरात कु .कौस्तुभ याचे व त्यांच्या पालकांचे कौतुक होत आहे .