मतदार संघाच्या विकास कामात भेदभाव नाही -मोनिका राजळे

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
पाटपाणी विज प्रश्न व सामान्य माणसांच्या कोणत्याही प्रश्न सोडवताना किंवा विकास कामे करत असताना आपण कधीही भेदभाव केला नाही अन् करणारही नाही. स्थानिक आडचणीमूळे विकास काम करतांना अडथळे येतात मात्र विकास कामात कोणिही आडकाठी आणू नये असे प्रामाणिकपणे प्रतिनिधित्व करताना वाटते. यापुढे वर्षानुवर्षे पाय घट् करून उभ्या असणाऱ्या प्रामाणिक कार्यकर्त्याला पुढील काळात येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका मध्ये बळ देण्याचे आवाहन या प्रसंगी शेवगाव- पाथर्डीच्या आमदार मोनिकाताई राजळे यांनी केले.
शेवगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये आमदार मोनिकाताई राजळे यांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ गुरुवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२२ रोजी तालुक्यातील मौजे मंगरूळ खुर्द येथे आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत हनुमान मंदिरासमोर सभामंडप भूमिपूजन, मौजे नागलवाडी येथे लेखाशिर्ष २५ / १५ अंतर्गत काशी केदारेश्वर रस्ता आमदार मोनिकाताई राजळे यांच्या स्थानिक निधीतुन, मजलेशहर येथील हनुमान मंदिरासमोर सभामंडपाचे भूमिपुजन आमदार मोनिकाताई राजळे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बापुसाहेब भोसले होते. यावेळी राज्य कार्यकारणी सदस्य बापुसाहेब पाटेकर, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष वाय.डि.कोल्हे,भाजपाचे शेवगाव तालुका अध्यक्ष ताराचंद लोढे, माहिला अध्यक्षा आशाताई गरड, अनिल सुपेकर प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. यावेळी भारत महाराज लोढे, वाय. डि.कोल्हे, माऊली लोढे आप्पासाहेब फटांगरे, नवनाथ फासाटे यांची भाषणे झाली. यावेळी मोहन लोढे, हिंगणगावचे सरंपच महादेव पवार, लक्ष्मण काशिद, सुभाष बरबडे, कल्याण जगदाळे, बशिरभाई पठाण, कानिफनाथ उमेदळ, रामाप्पा गिरम, रमेश कळमकर, सोपानराव वडणे,अशोक देशपांडे, माणिक शेकडे, अप्पासाहेब सुकासे, सुरेश थोरात, विक्रम लोढे, अण्णासाहेब लोढे, संदिप थोरात, जावेदभाई शेख यांच्यासह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुनिल पाहिलवान यांनी केले तर आभार भाऊसाहेब महाराज फटांगरे यांनी मानले
मजलेशहर येथील धरणग्रस्ताना मंजुर घरकुलांना जागा उपलब्ध करून द्या, शासनस्तरवर जागा उपलब्धतेसाठी प्रयत्न करावे अन्यथा मंजुर असूनही घरकुलांचा लाभ धरणग्रस्त लाभार्थानां मिळणार नाही. यासाठी नवनाथ फासाटे यांनी शेवगाव – पाथर्डीच्या आमदार मोनिकाताई राजळे यांच्यांकडे मागणी केली.