इतर

श्री क्षेत्र कोतुळेश्वर देवस्थान येथे भव्य दिपोत्सव सोहळ्याचे आयोजन

कोतुळ दि 4

अकोले तालुक्यातील कोतुळ येथे मुळा नदी च्या तीरावर श्री क्षेत्र कोतुळेश्वर देवस्थान येथे भव्य दिपोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे

कार्तिक (त्रिपुरारी) पौर्णिमा निमित्ताने.. भव्य दिपोत्सव सोहळा बुधवार दि. ०५ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी हा सोहळा पार पडत आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील हा सर्वात मोठा दिपोत्सव सोहळा आहे

  • सायं. ५.३० ते ६.३० वा. :- हरिपाठ (कोतुळेश्वर वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी )
  • सायं. ७ ते ८.३० वा. :- संगीत भजन (नादब्रम्ह संगित विद्यालय, कोतूळ)
  • (कोतूळ व पंचक्रोशीतील सर्व गुणीजन गायक, वादक यांचा सुमधूर भजनाचा कार्यक्रम होईल.)
  • रात्री ८.३० वा :- गंगा महाआरती, दिपदान व त्यानंतर महाप्रसाद असा यावेळी भव्य दिव्य सोहळा पार पडत आहे

ज्यांना महाआरती मध्ये सहभाग घ्यायचा आहे त्यांनी सर्व महिलांनी तुपाच्या फुलवाती, मेणबत्ती घेऊन उपस्थित रहावे, व या आनंदी सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन श्री कोतुळेश्वर महादेव देवस्थान ट्रस्ट, कोतूळ, श्री कोतुळेश्वर वारकरी शिक्षण संस्था व समस्त ग्रामस्थ यांनी केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button