दोन हजाराची लाच मागणारा वीज वितरण चा कर्मचारी अँटी करप्शनच्या जाळ्यात!

संगमनेर प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यातील वीज वितरण कंपनी मध्ये बाह्य स्रोत कर्मचारी असणाऱ्या श्रीधर परसराम गडाख, (वय-४० वर्ष,म.रा.वि.वि.कंपनी मर्यादीत, चंदनापुरी कक्ष–१, ता.संगमनेर, जि.अहमदनगर या कर्मचाऱ्याला २०००/- रुपयांची लाच स्विकारतांना रंगेहाथ पकडले.
, तक्रारदाराने त्याचे राहते घरी विज जोडणी घेणे करीता आईचे नांवे कोटेशन भरले होते. मात्र त्याला विज जोडणी न देता आरोपी लोकसेवक श्रीधर परसराम गडाख, याने नविन मीटर जोडणी मिळेपर्यंत अनाधिकृत तात्पुरते मीटर जोडणी करुन दिले व त्या मोबदल्यात यातील आरोपी लोकसेवक गडाख याने तक्रारदार यांचेकडे २०००/- रुपयांची मागणी केली. तक्रारदार याने याबाबत लाचलुचपत विभागाकडे तक्रार नोंदवली त्यावरून लाचलुचपत विभागाचे अधिकाऱ्यांनी आज दिनांक 30 डिसेंबर 2021 रोजी सापळा लावला
तक्रारदार यांच्याकडे २०००/- रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले
लाचेचा सापळा कारवाई दरम्यान तक्रारदार यांचेकडुन पंचासमक्ष दर्शन किराणा ॲण्ड जनरल स्टोअर, हिवरगांव पावसा, ता.संगमनेर येथे लाच स्विकारली असता आरोपी लोकसेवक गडाख यास रंगेहाथ पकडले आहे. सदर बाबत संगमनेर तालुका पोलीस स्टेशन, ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे
ही कारवाई मा.सुनिल कडासने, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्र, नाशिक, मा.नारायण न्याहळदे, अपर पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्र, नाशिक व मा.सतिश भामरे, वाचक पोलीस उप अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहमदनगर कडील पोलीस उप अधीक्षक हरिष खेडकर, पोलीस निरीक्षक पुष्पा निमसे, पो ना.रमेश चौधरी, पो कॉ.रविंद्र निमसे, पो कॉ.वैभव पांढरे, पो कॉ बाबासाहेब कराड, चालक पो हे कॉ.हारुण शेख व चालक पो ना. राहुल डोळसे यांचे पथकाने केली आहे.
कोणत्याही लोक सेवकाने सामान्य जनतेला त्यांचे काम करुन देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालय, अहमदनगर येथे दूरध्वनी क्रमांकावर ०२४१-२४२३६७७ ,टोल फ्रि नंबर १०६४ वर संपर्क साधावा असे आवाहन पोलीस उप अधीक्षक हरिष खेडकर यांनी केले आहे.
—–//—-