इतर
पारनेर तालुक्यात 90 हजार रेशनकार्ड धारकांना मिळणार 100 रुपयांत आनंदाचा शिधा किट !

सुजीत झावरे पाटील यांच्या हस्ते वासुंदे येथे शुभारंभ
दत्ता ठुबे/ पारनेर प्रतिनिधी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने रेशनकार्डधारकांना दिवाळीनिमित्त ‘आनंदाचा शिधा वाटप उपक्रमाची तालुक्यात सुरुवात झाली पारनेर तालुक्यातील वासुंदे येथे ‘आनंदाचा शिधा’ किराणा कीट वाटप उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी लोककल्याणकारी निर्णय घेऊन जनतेला दीपावलीनिमित्त रेशनकार्ड धारकांना किराणा कीट देण्याचा निर्णय घेतला. पारनेर तालुक्यातील ९० हजार व नगर तालुक्यातील ५० हजार रेशनकार्ड धारकांना याचा लाभ मिळणार आहे. या योजनेत लाभार्थीला १०० रुपयात प्रत्येकी १ किलो खाद्यतेल, रवा, चना दाळ व साखर मिळणार आहे.
यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील, सचिव सुदेश झावरे पाटील, चेअरमन नारायण झावरे, सरपंच भाऊसाहेब सैद, उपसरपंच शंकर बर्वे, व्हा. चेअमन रा. बा. झावरे, दिलीप पाटोळे, दिलीप उदावंत, पो.मा.झावरे, लहान भाऊ झावरे, बाळासाहेब शिंदे, लक्ष्मण झावरे, पोपटराव हिंगडे, मारूती उगले गुरुजी, धोंडीभाऊ मधे, सुदाम भालके, सुदाम झावरे, बबन तळेकर गुरुजी, सुंदरबापू झावरे, संग्राम झावरे, विठ्ल झावरे तसेच लाभार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.