मुरशेत येथे बी एस एन एल टाॅवरच्या वस्तुंची अज्ञात व्यक्तीनी केली मोडतोड

संजय महानोर
भंडारदरा / प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील मुरशेत येथील बी एस एन एल टाॅवरच्या ईलेक्ट्रीक वस्तुंची अज्ञात व्यक्तीनी मोडतोड केली असुन त्यासंदर्भात राजुर पोलिस स्टेशनला अज्ञात व्यक्ती विरोधात फिर्याद दाखल करण्यात आली आहे .
अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या रिंगरोडवर असणा-या मुरशेत गावामध्ये असणा-या बी एस एन एल टाॅवरच्या ईलेक्ट्रीकल सामानाची अज्ञात व्यक्तीकडुन शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास मोडतोड करण्यात आली . गुरुवारी अहमदनगर येथुन मुरशेतच्या राजवाड्याच्या जवळ असणा-या टाॅवरचे काम केल्यानंतर ही टीम संध्याकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास परत निघुन गेली होती . दुस-या दिवशी बी एस एन एल अधिकारी शुंभांगी शेलार यांनी टाॅवर मेंट॔नस कर्मचारी दत्तु म्हशाळ यांना मुरशेत येथील टाॅवर का बंद आहे अशी विचारणा केल्यानंतर म्हशाळ यांनी मुरशेत येथे जाऊन पाहणी केली असता ईलेक्ट्रीक वस्तुंची नुकसान केलेली दिसुन आली . यामध्ये १५०० रु किंमतीचे ईलेक्ट्रीक मीटर चोरुन नेण्यात आले तर २००० रु किमतीच्या कि पी फायबर केबल कापुन नुकसान करण्यात आले .१००० रु किंमतीची सप्लाय केबल तर १००० रु किंमतीची लॅन केबल कापुन नुकसान केले .१० हजार रु किंमतीच्या पाॅवर प्लॅड मधील मटेरीअलचीही तोडफोड केली गेली . या संदर्भात राजुर पोलिस स्टेशनला अज्ञात व्यक्तींविरुद्ध दत्तु मंगा म्हशाळ यांनी कायदेशीर फिर्याद दाखल केली आहे .त्या संदर्भात राजुर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्या अधिपत्याखाली पो .हे . दिलीप डगळे , अशोक काळे हे अधिक तपास करत आहेत.
भंडारदरा परीसरात कायम बी एस एन एलची सेवा विस्कळीत झालेली असते .त्या रोषातुन अज्ञात व्यक्तीकडुन नुकसान केले गेले असावे अशी प्रतिक्रिया टाॅवर परीसरातील नागरीकांडुन ऐकावयास मिळत असुन भंडारदरा परिसरात रस्त्याचे काम सुरु असल्याने कायम केबल तुटत असल्याने बी एस एन एल सेवा विस्कळीत होत असल्याची प्रतिक्रिया बी एस एन एल च्या एका कर्मचा-याने दिली आहे

–