तरुणांच्या ताकदीवर महाराष्ट्राचे राजकारण बदलल्या शिवाय राहणार नाही – शरदचंद्र पवार

माजी मंत्री पिचडांची घर वापशी नाहींच!
आमदार लहामटेंचा पवारांनी घेतला समाचार!
अकोले प्रतिनिधी
तरुणांच्या सामूहिक ताकदीवर महाराष्ट्राचे राजकारण बदलल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शरदचंद्र पवार यांनीं व्यक्त केला
स्व अशोकराव भांगरे यांच्या 61 व्या जयंती निंमित्ताने अकोले ( जिल्हा अहमदनगर )
येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते
शरदचंद्र पवार म्हणाले की लोकांच्या हिताची जपवणूक करणारे नेतृत्व यशवंतराव भांगरे यांचें रूपाने अकोले तालुक्यात जन्मला आले महाराष्ट्राच्या विधानसभेत मी ज्यावेळेला पहिल्यांदा गेलो त्यावेळी लोकांचे आणि आदिवासींचे प्रश्न यशवंतराव भांगरे यांनी प्रामाणिकपणे विधानसभेत मांडले नंतरच्या काळात ही जबाबदारी स्व.अशोकराव भांगरे यांनी घेतली परंतु दुर्दैवाने ते तुम्हा आम्हा सर्वांतून लवकर निघून गेले
सर्वसामान्य जनतेचे प्रश्न कसे सोडता येतील याची खबरदारी त्यांनी घेतली एका कार्यक्रमाचे निमित्ताने मी अकोल्यात आलो होतो त्यावेळी त्यावेळी त्यांनी जाहीर सभेत सांगितले होते पवार साहेब आमचे तुमच्याकडून काहीही मागणी नाही फक्त एकच काम करा की माझ्या मुलावर अमित वर लक्ष ठेवा हा शब्द त्यांनी माझ्याकडून जाहीर सभेत घेतला आहे ही त्यांची एकट्याची इच्छा नव्हती ती अकोले तालुक्यातील गोरगरीब जनतेची इच्छा होती जनतेसाठी झोकून देण्याचे काम त्यांनी केले

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोल ताना ते म्हणाले की आज शेतकरी काही जास्त काही मागत नाही पण शेतमाल पिकवण्यासाठी जो उत्पादन खर्च येतो एवढा तरी द्या ही एवढी एकमेव त्यांची मागणी आहे
शेतीला जोड धंदा असणाऱ्या दुधाला रास्त किंमत मिळाली पाहिजे यासाठी संघर्ष करण्याची वेळ कांद्याला रास्त भाव मिळाला पाहिजे यासाठी संघर्ष होत आहे पण घडतंय काय ? पण शेतकऱ्याला बळीराजाला न्याय देण्याची सरकारची तयारी आजच्या सरकारची नाही प्रधानमंत्री मोदी नाशिकला आले तेव्हा त्यांच्या सभेत एक शेतकरी मध्ये उठला आणि म्हटला तुम्ही जगाच्या गोष्टी सांगता पण आमच्या कांद्याला किंमत द्या एवढी साधी मागणी त्यांनी केली तर पोलिसांनी त्याला पकडले आणि आत टाकले
कांद्याची किंमत वाढवा ही मागणी करणाऱ्याला शेतकऱ्याला या देशात अधिकार नाही हे मोदींच्या राज्यात नाशिक मध्ये घडले
या राज्यकर्त्यांना शेती आणि शेतीसंबंधी च्या प्रश्नांची आस्था नाही शेती
लोकसभेत तुम्ही उत्तम काम केले याचा उल्लेख त्यांनी केला राज्यात 48 जागांपैकी 31 ठिकाणी लोकसभेला खासदार निवडून दिले नगर जिल्ह्यातील दोन्ही जागा मोठ्या मताधिक्याने निवडून दिल्या याची एक नवीन दिशा तुम्ही देशाला दिली आहे आता इथे न थांबता आज पासून 70 दिवसांनी विधानसभेची निवडणूक येत आहे
आम्ही लोकांनी ठरवलंय आता काहीही वागायचं नाही

महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्यांची शेतकरी कष्टकरी तरुण माणूस आया बहिणी या सगळ्यांच्या हिताची जपणूक करणार एक मजबूत सरकार आणायचं आहे त्यासाठी तुमची सामूहिक शक्ती हवी आहे यापेक्षा दुसरी काही नको
निलेश लंके निवडणुकीला उभे राहिले त्यांचे त्यांचे विरोधक मोठ्या नेत्यांनी जाहीर केले याला इंग्रजी येत नाही हा तिथे जाऊन काय करणार आमचा गडी पार्लमेंट मध्ये गेला पण मलाही काळजी होती पण धाड धाड इंग्रजी मध्ये बोलू लागला आणि माझ्या शेतकऱ्याचे हिताची जपणूक येथे होत नसेल तर मी कामकाजात चालू देणार नाही असे ठ नकावून सांगितल्याचे पवार म्हणाले
राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटी नंतर डॉ किरण लहामटे यांनीं शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार गटात सामील झालेले आमदार लहामटे यांचा त्यांनी आपल्या भाषणात खरपूस समाचार घेतला
शरद पवार म्हणाले की पाच वर्षांपूर्वी आम्ही एका डॉक्टरला निवडून दिल. मला असे वाटलं हा साधा माणूस आहे. शब्दाला किंमत देईन ,लोकांची साथ सोडणार नाही येथे सभेत त्यानं भाषण केलं . काही झालं तरी पवार साहेबांची साथ सोडणार नाही. आणि मुंबईत गेला आणि भलतीकडे जाऊन बसला. कुठे बसायचं हे ज्याला कळत नाही त्याला उद्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये कुठे बसवायचं हे ठरविण्याचे काम येत्या निवडणुकीत करायचं आहे
यावेळी किसान सभेचे डॉ अशोक ढवळे,आमदार डॉ सुधीर तांबे,खासदार निलेश लंके ,खासदार भाऊसाहेब वाकचौरे, मधुकर नवले ,डॉ अजित नवले, बी. जे.
देशमुख,सुनीताताई भांगरे, अमित भांगरे महेश नवले चंद्रकांत घुले, विनोद हांडे सुरेश गडाख यांनी यावेळीं मनोगत व्यक्त केले

यावेळी व्यासपीठावर दशरथ सावंत, जयश्री ताईं थोरात ,दादां कळमकर,,सत्यशील शेरकर संदीप वरपे, दिलीप भांगरे आदी सह जिल्ह्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते
सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी बी जे देशमुख
जयराम इदे ,स्वप्नील धांडे,विलास भरीतकर, निवृत्ती भोजने शाहिद फारुकी सागर बाळसरफ चंद्रकांत गोंदके यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात जाहिर प्रवेश केला