इतर
धाडगेवाडी नदीवरील पूल ठरतोय धोकादायक, जीव मुठीत धरून करावा लागतोय प्रवास

दत्ता ठुबे
पारनेर / प्रतिनिधी
सुपा जिल्हा परिषद गटातील राणी ताई लंके यांच्या मतदार संघातील तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे महीला तालुका अध्यक्ष सुवर्णा धाडगे व पारनेर तालुका भाजपा तालुकाध्यक्ष व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे कट्टर समर्थक राहुल शिंदे यांच्या रांजणगाव मशीद जवळील म्हसणे ते विसापूर रस्त्यांवर असलेला धाडगेवाडी जवळील इंग्रजांच्या काळातील दगडी पुल नागरीकांच्या प्रवासाच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक बनला आहे. या पुलावरील दगड पाऊसाचे प्रवाहाच्या पाण्याने उखडले गेल्याने त्या जागी मोठ मोठे खड्डे पडले आहेत. त्यामूळे रस्त्यावरून प्रवास करणारे दुचाकी वाहन व चारचाकी वाहन धारकांना प्रवास करणे जिकीरीचे झाले आहे. त्या मुळे नागरीकांच्या प्रवासाच्या दृष्टीने या पुलाची उंची वाढवण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
सविस्तर माहिती अशी की, पारनेर तालुक्यातील सुपा गटातील म्हसणे विसापूर रस्त्यावर धाडगेवाडी जवळील या पुलावर नेहमीच पाणी आल्यानंतर लोणकर वाडी (रांजणगाव मशीद) येथील शाळेत जाणारे विद्यार्थी, दूध वाले, ग्रामस्थ यांना जीव धोक्यात घालून रस्ता ओलंडावा लागतो. या परीसरात भरपूर पाऊस झाला आणि नदीला पाणी आले तर रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात येतो. परिणामी या परिसरातील नागरिकांना सुपा मार्गावरील रस्त्याचा वापर करावा लागतो. स्थानिक नागरीक या समस्या मुळे जाम वैतागले आहेत. या गटातील मतदार राजकारण्यांवर नाराजी व्यक्त करत आहेत. स्थानिक प्राथमिक माहिती मिळाली की, बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी दोन तीन वेळा या पुलाचा सर्वे केला गेला यानंतर कित्येक पावसाळे गेले पण नदी वरील पुल जसाच्या तसाच आहे. राजकारणी या ज्वलंत विषया साठी गंभीर का नाहीत हा प्रश्न सर्व सामान्य नागरिक करत आहेत. या पुलासाठी कोणा एकाही राजकारण्यांनी आंदोलन केल्याचे आठवत नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रश्न मार्गी लावणे आवश्यक आहे.
रांजणगाव येथे आमच्या मुलांना शाळेत जावे लागते. नदी वर पाऊस झाल्यानंतर सातत्याने गुडघ्या पर्यंत पाण्याचा प्रवाह असल्याने मुलांना धोका होण्याची शक्यता आहे. त्या मुळे स्थानिक राजकारणी यांनी या समस्या कडे लक्ष घालून लवकरात लवकर पुल करावा
- पारनेर विसापूर रस्त्यावर हंगा नदीवरील पुल लवकरात लवकर कऱण्यात येईल त्या साठी खासदार निलेश लंके यांच्या कडे पाठपुरावा करण्याचा प्रयत्न राहील.
- संग्राम हिकडे निलेश लंके प्रतिष्ठान, रांजणगाव मशीद.