इतर

वाहतूक सप्ताहाच्या निमित्ताने अकोले एस.टी डेपोतील वाहन चालकांचा सत्कार

अकोले (प्रतिनिधी)

अकोले तालुका अदिवासी तालु‌का डोंगराळ दऱ्याखोऱ्यांचा आहे‌.तुटपुंज्या बस असतानाही वाहतूक नियंत्रकाचे नियंत्रण दररोजच्या एसटी बस ग्रामीण भागात वेळेत जातात या सर्व कामाची दखल घेऊन ग्राहक पंचायत महाराष्ट्राच्या प्रवासी संघटनेने मकर संक्रातीच्या निमित्ताने वाहतूक सप्ताह काळात वाहक व चालकांचा तिळगुळ गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.


अकोले एसटी डेपोच्या बसेसच्या अत्यंत दूर्दर्शा आहे. सध्या थंडीचे दिवस असताना बसेसच्या काचा फुटलेल्या, जुनाट बसेस, पत्रे तुटलेले अशा अवस्थेत असताना सुद्धा वाहतूक नियंत्रकाच्या मार्गदर्शनाखाली आपण जीव धोक्यात घालून दऱ्या खोऱ्यांत व घाटाच्या रस्त्याने हे कर्मचारी बस चालवतात. एकीकडे सरकारने चांगले रस्ते केले मात्र बस नादुरुस्त असल्याने प्रवाशांसह, विद्यार्थी, नागरिक यांचाही जीव धोक्यात असतो. या सर्व गोष्टीवर मात करून बसचे उत्पन्न बऱ्यापैकी आहे. या सर्व कामाचा व्याप कामाची दखल घेऊन वाहन चालकांचा सत्कार करण्यात आला.
यात प्रामुख्याने डेपो मॅनेजर श्रीमती सोनाली संगमकर, वाहतूक नियंत्रण गवळी व एल. एन धोंगडे, शितल शिंदे, अशोक कडलक, अनंता उगले, रंगनाथ पारधी, सोमनाथ गंभीरे, केशव गोंदके, एस.पी लेंडे, भगवंता भांगरे आदी कर्मचाऱ्यांचा ग्राहक पंचायत प्रवासी संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा प्रवाशी संघटनेचे सदस्य भाऊसाहेब वाकचौरे, ग्राहकपंचायत चे ज्येष्ठ मार्गदर्शक मच्छिंद्र मंडलीक,रमेश राक्षे, ग्राहक पंचायत तालुका अध्यक्ष दत्तात्रय शेणकर, ज्ञानेश पुंडे,सकाहारी पांडे, नरेंद्र देशमुख, तालुका सचिव राम रुद्रे, सुरेश गायकवाड, सुनील देशमुख, साहेबराव दातखिळे, दत्ता ताजणे, मच्छिंद्र चौधरी, अमोल भोतआदी कार्यकर्ते उपस्थित होते..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button