राशिभविष्य

आजचे पंचांग व राशिभविष्य दि १५/०२/२०२२

🙏 सुप्रभात 🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- माघ २६ शके १९४३
दिनांक :- १५/०२/२०२२,
वार :- भौमवासरे(मंगळवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:५८,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:२९,
शक :- १९४३
संवत्सर :- प्लव
अयन :- उत्तरायण
ऋतु :- शिशिरऋतु
मास :- माघ
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- चतुर्दशी समाप्ति २१:४३,
नक्षत्र :- पुष्य समाप्ति १३:४८,
योग :- सौभग्य समाप्ति २१:१७,
करण :- गरज समाप्ति ०९:१०,
चंद्र राशि :- कर्क,
रविराशि – नक्षत्र :- कुंभ – धनिष्ठा,
गुरुराशि :- कुंभ,
शुक्रराशि :- धनु,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- चांगला दिवस,

राहूकाळ:- दुपारी ०३:३६ ते ०५:०२ पर्यंत,

लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी ११:१७ ते १२:४३ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी १२:४३ ते ०२:१० पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी ०३:३६ ते ०५:०२ पर्यंत,

दिन विशेष:-
भद्रा २१:४३ नं.,
————–

🌏 दैनिक राशीभविष्य 🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- माघ २६ शके १९४३
दिनांक = १५/०२/२०२२
वार = भौमवासरे(मंगळवार)

मेष
कौटुंबिक शांतता जपावी. आपली छाप पडण्यात यशस्वी व्हाल. मनमोकळ्या स्वभावाचे दर्शन घडवाल. कौटुंबिक कामात दिवस जाईल. मानसिक ताण जाणवेल.

वृषभ
जवळच्या प्रवासात सावधानता बाळगावी. मनातील नसती भीती दूर सारावी. मानसिक चांचल्य जाणवेल. नवीन गोष्टी आवडीने जाणून घ्याल. उगाचच त्रागा करू नका.

मिथुन
आवेगाला आवर घालावी लागेल. गृहोपयोगी वस्तू खरेदी कराल. व्यावसायिक कमाईकडे लक्ष द्यावे. आवाजात गोडवा ठेवावा. वैवाहिक सौख्याकडे लक्ष ठेवावे.

कर्क
मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष द्यावे लागेल. चटकन निराश होऊ नका. बौद्धिक चलाखी दाखवावी. वागण्या-बोलण्यात सज्जनपणा ठेवाल. भावनाशीलता वाढू शकते.

सिंह
वैचारिक स्थिरता ठेवावी. नैराश्याला दूर सारावे. प्रवासात सतर्कता बाळगावी. जोडीदाराची प्राप्ती वाढेल. तुमच्या संपर्कातील लोकात भर पडेल. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल.

कन्या
मैत्रीचे संबंध जपावेत. स्त्री समूहात वावराल. सुखासक्तपणा जाणवेल. कामात काहीशी चालढकल कराल. पैज जिंकता येईल.

तूळ
प्रेमाच्या दृष्टीने मैत्री घट्ट होईल. चौकसपणा दाखवाल. व्यापारी वर्गाला चांगला लाभ मिळेल. कामात वारंवार बदल करू नका. आपला दर्जा टिकवण्याचा प्रयत्न कराल.

वृश्चिक
खर्च वाढू शकतो. आर्थिक व्यवहार सावधानतेने करावेत. घरातील कामात अडकून पडल्यासारखे वाटेल. शब्द जपून वापरावे लागतील. गुंतवणुकीत फसगत होण्याची शक्यता आहे.

धनू
श्रम व दगदग वाढेल. क्षुल्लक कारणांनी खिळून पडल्यासारखे वाटेल. डोकेदुखीचा त्रास जाणवू शकतो. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. गैरसमजातून वाद वाढू देऊ नका.

मकर
जुन्या प्रकरणातून त्रास संभवतो. खर्चाचे योग्य नियोजन करावे लागेल. मानसिक स्वास्थ्य जपावे. स्त्री वर्गापासून दूर राहावे. कोर्ट कचेर्‍यांची कामे त्रासदायक ठरू शकतात.

कुंभ
गप्पांमध्ये वेळ घालवाल. मानापमानात अडकून पडू नका. मौल्यवान वस्तू खरेदी केल्या जातील. कष्टाला मागे पुढे पाहू नका. मित्र मंडळींशी सलोखा ठेवावा लागेल.

मीन
आपली प्रतिष्ठा जपावी. विरोधकांच्या कारवाया वाढू शकतात. काही अनपेक्षित बदल दिसून येतील. सहकार्‍यांशी जुळवून घ्यावे लागेल. कामाचे योग्य नियोजन करावे लागेल.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button