महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या शेवगाव तालुका अध्यक्षपदी शहाराम आगळे यांची निवड!

अहमदनगर प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाच्या शेवगाव तालुका अध्यक्षपदी दैनिक लोकमंथनचे प्रतिनिधी भायगाव येथील रहिवासी शहाराम आगळे तर कार्याध्यक्षपदी रविंद्र मडके यांची एकमताने निवड करण्यात आली.
जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नवगिरे यांनी निवडीचे पत्र देऊन एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे तसे जाहिर केले
.
आगळे यांनी ग्रामीण भागातील अनेक विषयावर सातत्याने लिखाण करून न्याय मिळून देण्याचे काम केले आहे. ग्रामीण भागातील शेती, वीज, शालेय विदयार्थ्यचे प्रश्न वेळप्रसंगी अनेक चळवळी उभ्या करून,आंदोलन करुन व लिखानाच्या माध्यमातुनही आवाज उठवले आहेत. त्यांना यापुर्वी आनेक पुरस्कांरांनीही सन्मानित केले गेले आहे.याचीच दखल घेऊन त्यांची यापुर्वीच महाराष्ट्र राज्य शब्दगंध सहित्य परिषदेच्या शेवगाव तालुका कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाच्या शेवगाव तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबदद्ल त्याचे शेवगाव – पाथर्डी मतदारसंघाच्या आमदार मोनिकाताई राजळे, राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते अॅड प्रतापकाका ढाकणे, माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, जनशक्ती विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अॅड.शिवाजीराव काकडे, जेष्ठ विचारवंत कॉ. बाबा आरगडे, शब्दगंध साहित्य परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, सुनिल गोसावी, माजी जिल्हा पोलीस अधिक्षक डि.डि.गवारे, शब्दगंधचे शेवगाव तालुका अध्यक्ष हरिभाऊ नजन, वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण, शेतकरी संघटनेचे दत्तात्रय फुंदे,
जेष्ठ साहित्यिक व माजी पोलीस अधिकारी सुभाष सोनवणे, भाजपाचे जिल्हयाचे नेते वाय.डी. कोल्हे, जेष्ठ पत्रकार आर. आर.माने, शेवगाव – पाथर्डी मतदारसंघाच्या प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष. रामजी शिदोरे, भायगाव सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष अॅड.लक्ष्मणराव लांडे, नाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड.सागर चव्हाण यांनी आभिनदन केले आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाची शेवगाव तालुका कार्यकारणी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नवागिरे यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच जाहिर करण्यात येणार आहे. यासंदर्भात लवकरच निर्णय घेऊन सर्व सवावेशक अशी कार्यकारणी असणार आहे. शहरी आणि ग्रामीण पत्रकार हा भेद संपवण्यासाठी आपण चांगल्या पद्धतीने संघटनात्मक काम करू
शहाराम आगळे
अध्यक्ष – महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ शेवगाव तालुका