मुलींनी सावित्रीबाईंचा वारसा पुढे चालवावा…! डॉ.शितल लंके

विलास तुपे
राजूर./प्रतिनिधी
मवेशी शैक्षणिक संकुल ता.अकोले जि.अ.नगर येथे मंगळवार दिनांक 8 मार्च 2022 रोजी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूल व आदश॔ आश्रम शाळा भंडारदरा कॅम्प मवेशी यांच्या संयुक्त विद्यामाने जेष्ठ अधिक्षिका श्रीम.भारती भोकरे यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक महिला दिनाच्या काय॔क्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास अकोले पंचायत समितीच्या सभापती श्रीम.ऊर्मिला राऊत व मवेशी ग्रामीण आरोग्य प्रकल्पाच्या वैद्यकीय अधिकारी श्रीम.डाॅ. शितल लंके,श्रीम.सुनिता राजगिरे, श्रीम.निता डोके,श्रीम.डगळे,
रूपाली डोंगरे, सुमन सहाणे, रंजना जगधने,राजश्री पवार,रेणुका कातकडे व धादवड मॅडम या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थितीत होत्या डाॅ. शितल लंके आपल्या प्रमुख भाषणात म्हणाल्या की आताच्या काळात स्त्रियांची कीर्ती सर्वदूर पसरत आहे . पण काही समाजात आणि क्षेत्रात आजही स्त्रियांवर प्रचंड प्रमाणात अन्याय ,अत्याचार होत आहेत . यासाठी माझी समस्त महिला वर्गास विनंती आहे की डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या हिंदू कोड बिलाची माहिती प्रत्येक शिक्षित महिलेने अशिक्षित महिलेपर्यंत पोचविण्यासाठी कसोशीने प्रयत्न करावेत.तसेच आजच्या महिलांनी आपली मानसिकताही बदलायला हवी . प्रशासनात महिलांच्या दृष्टीने विधायक बदल करण्यात आले असून आज भारतीय महिलांच्या जीवनात जो आशादायी व प्रेरणादायी बदल दिसून येत आहेत .व यापुढेही महिलांच्या दृष्टीने फार मोठ्या बदलाची रास्त अपेक्षा आहे.असे विचार डाॅ.लंके यांनी आपल्या भाषणात मांडले. काय॔क्रमात आदश॔चे कुलप्रमुख श्री. भाऊसाहेब खरसे, प्राचार्य डाॅ. देवीदास राजगिरे व मुख्याध्यापक श्री. शिवराज कदम सर यांनीही आपले विचार मांडले.आपल्या अध्यक्षीय भाषणात श्रीम.भारती भोकरे म्हणाल्या की,शिक्षणाच्या मार्गाने मुली शिकुन आज स्वतःच्या पायावर उभा असून अनेक मुलींनी सावित्रीबाईंचा वारसा पुढे चालवला असून महाराष्ट्रातील मुलींच्या शिक्षणातील चित्र येणार्या काळासाठी आशादायक असल्यचे श्रीम. भोकरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मांडले.काय॔क्रमात शाळेतील मुलींनी भाषणाव्दारे व गाण्यांचा माध्यमातून महिला इतिहासाला उजाळा दिला. तर पंचक्रोशीतील विविध महिला श्रीम.धिंदळे, माळी,पगारे,कोंडार व इतर महिलाही उपस्थित होत्या .या काय॔क्रमाच्या प्रसंगी एकलव्य मॉडेल रेसिडेन्सीअल स्कूलचे क्रीडा शिक्षक उदमले सर यांनी नगर जिल्ह्य वुशू संघटणेतर्फे बाॅक्सींगसाठी आवश्यक साहित्य शाळेस भेट दिले तसेच विद्यार्थीनींना स्वसंरक्षणाचे (जुडो-कराटे) प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांचे मने जिंकली.काय॔क्रमाचे सुत्रसंचालन श्री पारधी यांनी केले तर प्रास्ताविक श्री. आदिनाथ सुतार सर व काय॔क्रमाच्या शेवटी आभार श्री पवार सर यांनी मानले. काय॔क्रमास मवेशी संकुलातील सर्व महिला बंधू-भगिनींची उपस्थिती उस्फूर्त होती.
