राज्यपालांच्या हस्ते झालेला सन्मान हा माझ्या मातीचा सन्मान! – सुरेशराव कोते

कोतुळ /प्रतिनिधी
फळाची अपेक्षा न ठेवता सामाजिक काम केले तर त्याचे फळ नक्की मिळते नियती त्याची दखल घेते नीरपेक्ष भावनेने केलेल्या कामातून चांगले समाधान मिळते मला राज्यपालां च्या हस्ते झालेला माझा सन्मान हा माझा नसून माझ्या कर्मभूमितील मातीचा सन्मान असल्याचे प्रतिपादन लिज्जत पापड चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेशराव कोते यांनी केले
श्री सुरेशराव कोते यांचा महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिह कोशारी कर्नाटक राज्याचे राज्यपाल यांचे हस्ते नुकताच सन्मान झाला या निमित्त त्यांचा अकोले तालुका पत्रकार संघाचे वतीने कोतुळ येथे सत्कार केला यावेळी ते सत्काराला उत्तरं देताना बोलत होते

चांगले करता आले नाही तर कुणाचे वाईट करू नये हा माझ्या वडिलांचा उपदेश कायम पाळत आलो त्या उपदेशाची शिदोरी कामाला आली त्या उपदेशानुसार आपलीं वाटचाल सुरु आहे माणूस येताना आणि जाताना काहीही बरोबर नेत नाही त्यामुळे जेवढे चांगले कर्म करता येईल तेवढे चांगले कर्म करावे देश पातळीवर अनेक सामाजिक संस्थांमध्ये काम करत असताना मी कधीच माझी जाहिरात बाजी केली नाही सामाजिक काम करताना अनेक वेळा माझा सन्मान झाला हा सन्मान माझ्या मातीचा सन्मान असल्याचे श्री कोते यांनी सांगितले
पत्रकार संघाकडून होणारा सत्कार हा आपल्या घरातील आणि परिवातील सत्कार आहे घरातील सत्कार आईने पाठीवर हात फिरवल्या सारखा असतो त्याने प्रेरणा आणि ऊर्जा मिळते असे यावेळी ह. भ. प. योगी केशवंबाबा चौधरी यांनी यावेळी आपल्या मनोगतात सांगितले
जिल्हा बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी उल्हास गोडसे ,रवींद्र बोऱ्हाडे,, पत्रकार संजय उकिरडे ,राजेंद्र उकिरडे, विनय समुद्र, नरहरी गावडे यांनी यावेळी श्री कोते यांच्या कार्याचे कौंतुक केले

कोतुळ गावचे सुपुत्र सुरेशराव कोते यांचा राज्य आणि देश पातळीवर झालेला सन्मान हा दुर्मिळ आणि अकोले तालुक्याला भूषणावह असल्याचे सांगत सुरेशराव कोते यांच्या कार्यावर लवकरच एक पुस्तक प्रकाशित करणार असल्याचे पत्रकार सुनील गिते यांनी सांगितले पत्रकार संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र उकिरडे यांनी शेवटी आभार मानले