इतर

श्री बाळेश्वर विद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी

संगमनेर-अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री बाळेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सारोळे पठार या विद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी करण्यात आली

याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य श्री उत्तम खांडवी व शिक्षक यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन केले.
या कार्यक्रमांच्या निमित्ताने विद्यालयात वकृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या वकृत्व स्पर्धेमध्ये 35 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता यामध्ये प्रथम क्रमांक संस्कृती किनीकर, द्वितीय क्रमांक राहुल चौधरी, तृतीय क्रमांक अश्विनी गवळी या विद्यार्थ्यांना पेन व गुलाब पुष्प देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी विद्यालयाचे प्राचार्य श्री उत्तम खांडवी बोलत होते अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व जालना देणारे आहे महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान हे महत्त्वपूर्ण मानले जाते आजही मोठ्या संख्येने विद्यार्थी अभ्यासत हे त्यांच्या या साहित्याचा संशोधनात्मक अभ्यास करताना दिसतात संयुक्त महाराष्ट्र चळवळ लोकमानसात रुजवण्याचे काम शाहीर अण्णाभाऊ साठे यांनी केले. अण्णाभाऊ साठे यांच्यावर कार्ल मार्क्स आणि आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव होता हे समाज सुधारक आणि साहित्य लेखक देखील होते त्यांनी अनेक कथा कादंबरी आणि कवितांचे लेखन केले अण्णाभाऊ साठे महाराष्ट्रात एक अत्यंत लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याने अनेकांना प्रेरणा दिली त्यांचे प्रेरणादायी विचार सुद्धा सर्वांसाठी मार्गदर्शक करत आहेत त्यांनी पोवाडे गीत आणि लावण्याचा माध्यमातून आपले विचार गरीब जनतेपर्यंत पोहोचवले त्यांना लोकशाहीर ही पदवी दिली. लोकमान्य टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे ब्रीद वाक्य त्यांचे होते त्यांनी आपल्या चळवळीतून इंग्रजांना सळोकीपोळा करून सोडले होते टिळकांनी अनेक सामाजिक कार्यासोबतच गणेशोत्सवाला सुरुवात केली तसेच विविध हिंदू संस्कृती आणि परंपरेचर त्यांनी जतन केले.


याप्रसंगी श्री मधुकर बांबळे, श्री भाऊराव धोंगडे, श्री सुरेश देशमुख, श्री विकास सोनवणे, श्री रघुनाथ मेंगाळ, श्री अशोक जाधव, श्री गंगाधर पोखरकर, श्री विठ्ठल फटांगरे, श्री चेतन सरोदे, श्री नारायण डोंगरे, संतोष भांगरे, श्रीकृष्ण वर्पे हे उपस्थित होते सूत्रसंचालन प्रतीक्षा मराडे या विद्यार्थिनीने केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button