अहमदनगर

पिचड यांचे हस्ते उद्या कोतुळ येथे  छत्रपती चषक स्पर्धेचे उद्घाटन !

कोतुळ प्रतिनिधी

जेष्ठ नेते  मधुकरराव पिचड व माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या बुधवार दिनांक २३/ ३/ २०२२ रोजी विविध  कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे 
भारतीय जनता पार्टी कोतुळ शाखेच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून बुधवारी सकाळी आठ वाजता कोतुळ शहरातून भव्य मिरवणूक ,सकाळी नऊ वाजता कोतुळ बस स्थानक जवळ भारतीय जनता पार्टी  शाखेचे उद्घाटन सकाळी 10:30 वाजता कोतुळ प्रीमियम छत्रपती चषकाचे उद्घाटन होणार आहे
 यावेळी यावेळी जेष्ठ नेते  मधुकरराव पिचड, माजी आमदार वैभवराव पिचड, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, जिल्हा परिषद सदस्य कैलासराव वाकचौरे ,लिज्जत पापड चे कार्यकारी अधिकारी सुरेशराव कोते, जिल्हा परिषद गटनेते जालिंदर वाकचौरे ,पोलीस निरीक्षक मिथुन घुगे, भाजपा तालुकाध्यक्ष सिताराम भांगरे, वसंतराव मानकर ,शिवाजीराजे धुमाळ, जे.डी आंबरे,सुधाकरराव देशमुख, रावसाहेब वाकचौरे, राहुल देशमुख ,गिरजीबुवा  जाधव ,राज गवांदे आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत याप्रसंगी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सिताराम पाटील देशमुख ,अगस्ती चे संचालक बाळासाहेब देशमुख ,माजी संचालक सयाजीराव  देशमुख, भाजपाचे सोमदास पवार, राजेंद्र पाटील देशमुख, आदींनी केले आहे  

मधुकरराव पिचड, माजी आमदार वैभव पिचड यांच्या हस्ते कोतुळ प्रीमियर लीग २०२२ छत्रपती क्रिकेट क्लब कोतुळ आयोजित  छत्रपती चषकाचे   उद्घाटन सकाळी दहा वाजता कोतूळ  येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम वर होणार आहे 

७१ हजाराचे प्रथम पारितोषिक


 छत्रपती चषक स्पर्धेसाठी माजी आमदार वैभव पिचड यांचेकडून ७१ हजाराचे प्रथम पारितोषिक, ग्रामपंचयत सदस्य राजेंद्र पाटील देशमुख व शंकरराव  घोलप माजी उपसरपंच गणेश पोखरकर,यांच्याकडून ५१ हजार रुपयांचे द्वितीय  पारितोषिक ,

अकोले बाजार समितीचे उपसभापती भरत देशमाने ,भाजपा चे युवक अध्यक्ष शाम देशमुख यांचे कडून ३१ हजाराचे तृतीय पारितोषिक,

शुभम वाकचौरे यांचेकडून २१ हजाराचे चतुर्थ पारितोषिक देण्यात येणार आहे या व्यतिरिक्त  सहभागी संघांना अनेक वैयक्तिक स्वरूपाचे पारितोषिक देण्यात येणार आहे कोतुळ येथे प्रथमच एवढ्या मोठया स्वरूपातील अशी स्पर्धा होतआहे 

 माजी मंत्री मधुकरराव पिचड व  माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या प्रयत्नातून मंजूर करण्यात आलेल्या कोतूळ शहरातील विविध विकास कामांचा शुभारंभ व विकास कामांचे उद्घाटने  होणार असल्याचे राजेंद्र पाटील देशमुख यांनी सांगितले तसेच -अकोले नगर पंचायत च्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष व नगरसेवकांचा नागरी सत्कार कोतुळ भाजप शाखेच्यावतीने करण्यात येणार आहे    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button