इतर

अण्णांचा राळेगणसिद्धीत जमावबंदी जाहीर!

उपोषणकर्ते निर्णयावर ठाम ,
टॅंकर घोटाळा प्रकरण तापले


पारनेर प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील टॅंकर घोटाळाप्रकरणात जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे सहकारी तपास यंत्रणेवर प्रभाव दाखवून प्रकरण दडपत असल्याचा आरोप केला आहे
लोकजागृती सामाजिक संस्थेने राळेगणसिद्धीत उपोषण पुकारले आहे . पोलिस प्रशासनाने कायदा-सुव्यवस्थेचे कारण पुढे करून लोकजागृतीच्या पदाधिकाऱ्यांना फौजदारी संहितेच्या कलम १४९ प्रमाणे प्रतिबंधात्मक नोटीस देऊन उपोषण थांबवण्याचे आवाहन केले होते . परंतु त्यांनी नकार देत उपोषणावर ठाम असल्याचे प्रशासनाला कळविले . त्यामुळे काल दिनांक ९ रोजी पारनेरचे तहसीलदार शिवकुमार आवळकंठे व पोलीस निरीक्षक धनशाम बळप यांनी उपोषणामुळे राळेगणसिद्धीत कायदा-सुव्यवस्था व अण्णा हजारेंच्या सुरक्षेची स्थिती बिघडण्याची शक्यता असल्याचा अहवाल जिल्हाधिकारी यांना दिला होता . उपविभागीय पोलिस अधीक्षक अजित पाटील यांनीही उपोषणकर्त्यांची काल चर्चा केली होती , परंतु उपोषणकर्ते ठाम राहिले .
अण्णा हजारे यांना झेड दर्जाची सुरक्षा असल्यामुळे व उपोषणकर्ते हे हजारे यांच्याशी संबंधित विषयावर उपोषण करत असल्यामुळे येथे कायदा-सुव्यवस्था व हजारे यांच्या सुरक्षेला धोका असा प्रश्न निर्माण होऊ शकतो . असे कारण देवून राळेगणला तीन दिवसांची जमावबंदी लागू केली . याबाबतचा आदेश उपविभागीय दंडाधिकारी सुधाकर भोसले यांनी काढला .
टॅकर घोटाळाप्रकरणी लोकजागृती सामाजिक संस्थेने सतत पाठपुरावा केल्यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर घोटाळेबाजांवर शासनाच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता . या टँकर घोटाळ्यातील आरोपी हे अण्णा हजारे यांच्या गावातील असून त्यांचे सहकारी आहेत . त्यामुळे आरोपी अण्णांच्या जवळच्या संबंधामुळे तपास यंत्रणेला प्रभावित करत असल्याचा आरोप लोकजागृतीने केला आहे . म्हणून या प्रकरणी अण्णांनी व राळेगण-सिद्धी परिवाराने ग्रामसभा बोलावून या प्रकरणाचा सखोल तपास व चौकशीची मागणी करावी असे
प्रतिष्ठानचे म्हणणे आहे .
परंतु त्यांच्या मागणीला केराची टोपली दाखवल्यामुळे त्यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे .
उपोषणकर्ते यांनी याप्रकरणी अण्णा हजारेंची भेट घेण्यासाठी गेले असता त्यांना भेट नाकारण्यात आली होती . त्यामुळे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे या प्रकरणात मौन धारण करून घोटाळेबाजांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करण्यात येत आहे . लोकजागृती सामाजिक संस्थेने या प्रकरणी आक्रमक भूमिका घेऊन ग्रामपंचायत राळेगण सिद्धी ,भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास , अण्णा हजारे यांच्या विरोधात प्राणांतिक उपोषण पुकारले आहे .

तरीही उपोषण करणार


जमावबंदी लागू केली असली तरी आम्ही उद्या राळेगणला प्रवेश करून यादवबाबा मंदीरात शांततेच्या मार्गाने उपोषण करणार आहोत . आम्ही तिथे कायदा-सुव्यवस्था , शांतता पाळून व अण्णांच्या सुरक्षेला बाधा निर्माण होईल असे वर्तन करणार नाही .

  • रामदास घावटे
  • (अध्यक्ष लोकजागृती सामाजिक संस्था )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button