उडदावणे येथे शाळापूर्व तयारी अभियान मेळावा संपन्न

भंडारदरा / प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील आदिवासी भागातील उडदावणे येथे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये नुकताच शाळा पूर्वतयारी अभियान शाळास्तर मेळावा व लोकसहभाग देणगीदार सत्कार समारंभ संपन्न झाला असुन या कार्यक्रमासाठी परिसरातील पालकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला होता
याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री सखाराम गांगड हे होते.प्रमुख पाहुणे म्हणून टायगर्स आय आय टी बाॅम्बे या संस्थेचे प्राध्यापक कृष्णन नारायणन , विनोद भालेराव , सतिश कुमार, पार्वती नारायणन , निलिमा जोरवर पांजरे केंद्राचे केंद्रप्रमुख सिताराम धांडे , शाळेचे माजी मुख्याध्यापक देवराम बोटे, जगताप भाऊसाहेब हे होते. कार्यक्रमात बुवाजी गांगड, सरपंच भिमराज गि-हे , .भोरु गि-हे, विद्यार्थी,शिक्षक, पालक,ग्रामस्थ अंगणवाडी सेविका यानी सहभाग नोंदवला.
कार्यक्रमात प्रथम विद्यार्थी प्रभात फेरी,शाळा पूर्वतयारी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.शाळेसाठी टायगर्स आय आय टी बाॅम्बे या संस्थेने एक कपाट , ३ एल ई डी टी व्ही संच , .१ संगणक सि पी यु , ,१० खुर्च्या, १ वार्ताफलक,व विद्यार्थी उपयोगी शैक्षणिक साहित्य शाळेसाठी दिले . तर उडदावणे गावच्या ग्रामपंचायतकडुन शाळेसाठी २ एल ई डी टी व्ही संच व शाळेच्या बाह्यभागातील भिंतीवर चित्रमय रंगकाम करण्यात आले . शाळेचे माजी मुख्याध्यापक .बोटे यानी १ एल ई डी टी व्ही संच शाळेस सप्रेम भेट दिला.या सर्वांचा शाळेच्यावतीने सत्कार करण्यात आला.

मान्यवरांनी शाळेच्या भौतिक सुविधा,शैक्षणिक वातावरणाबाबत समाधान व्यक्त केले . आपल्या भाषणामध्ये विद्यार्थ्यांनी या साहित्याचा शिक्षणासाठी उपयोग करावा याची माहीती पाहुण्यांनी दिली .निलिमा जोरवर यांनी उडदावणे गाव आणि शाळेशी माझे अतूट नाते असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सखाराम गांगड यांनी मान्यवरांच्या कार्याचा गुणगौरव करत शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचवण्यासाठी,शाळेच्या प्रगतीसाठी यापुढेही सर्वतोपरी सहकार्य करण्याची इच्छा व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रामकृष्ण मधे यांनी केले तर प्रास्ताविक सोमनाथ उघडे यांनी केले ,मान्यवरांच्या सत्कारासाठी पोटकुले , मनोहर आढळ .बाळू बांडे ,.गणपत उघडे .तळपे ,सुनंदाताई मोरे यानी पुढाकार घेतला . आभार प्रदर्शन मुख्या.लहु भांगरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कुसा मधे,गंगाराम गिर्हे,भवानी गांगड, भारत केव्हारी, संजय गिर्हे व सर्व ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले.
