श्री बाळेश्वर विद्यालयात डाॕ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी!

संगमनेर प्रतिनिधी
जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री बाळेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सारोळे पठार या विद्यालयात राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली
यावेळी विद्यालयाचे प्राचार्य श्री प्रकाश खेमनर श्री भारत हासे, श्री चेतन सरोदे व शिक्षक वृंद या मान्यवरांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन केले बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने विद्यालयात वकृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेच्या निमित्ताने विद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला .
या कार्यक्रम प्रसंगी विद्यालयाचे ज्येष्ठ प्राध्यापक भारत हासे बोलत होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 18 91 महू गावी मध्य प्रदेश या ठिकाणी त्यांचा जन्म झाला हजारो वर्षापूर्वी जगाला शांततेचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध ,पराक्रमी सु शासक राजा सम्राट अशोक महाराष्ट्रातील माणसाच्या मनामनात आणि इथल्या मातीच्या कणाकणात ज्यांनी स्वाभिमान निर्माण केला आणि आपल्या तलवारीच्या टोकावर हिंदवी स्वराज्य निर्माण केले ते जाणते राजे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, संत कबीर, स्त्री शिक्षणाचा पाया उभा करणारे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले, पहिल्या महिला श्री मुख्याध्यापिका की ज्यांनी दगड-गोटे झेलून स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली त्या माता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ,थोर सुप्रशासन अहिल्याबाई होळकर ,आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे ,लोकनायक जननायक बिरसा मुंडा ,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना प्रथम अभिवादन कोळशाच्या खाणीतून हिरा मिळावा तसे दलित कुटुंबात दलित समाजात हि-या पेक्षाही तेज ज्ञानी जन्माला आले ते म्हणजे ज्ञानाचे प्रतीक भारतीयांसाठी अभिमान असणारे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेवटपर्यंत बाबासाहेबांना साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी माता रमाई .आज डॉ बाबासाहेब आंबेडकरांची 131 वी जयंती आंबेडकरांची जयंती आज फक्त भारतात नव्हे तर 156 देशात साजरी होत आहे बाबासाहेब केंब्रिज विद्यापीठात शिक्षण घेत असताना त्यावेळी जगातील दोनशे बुद्धिमान विद्यार्थ्यांच्या यादीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव पहिल्या क्रमांकावर होते ते आजही पहिल्या क्रमांकावरच आहे त्या ठिकाणी विद्यापीठाच्या आवारात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात आला आहे व त्या पुतळ्याच्या खाली लिहिले आहे पण लिहिले आहे ज्ञानाचे प्रतीक आम्हा सर्व भारतीयांसाठी ही किती अभिमानाची बाब आहे पुढे या ठिकाणी असेही लिहिले आहे की आम्हाला अभिमान आहे की डॉ बाबासाहेब आंबेडकर या आमच्या विद्यार्थ्यांनी पुढे जाऊन एका स्वतंत्र देशाची सर्वात मोठी असणारी राज्यघटना लिहिली याचाच अर्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संपूर्ण जगाला कळाले मात्र आपण आता त्यांना समजून घेतोय म्हणतात ना जिथे पिकते तिथे विकत नाही परंतु आता काळ बदलतोय आंबेडकरांनी फक्त दलितांसाठी शोषितांसाठी स्त्रियांसाठीच कार्य केले नसून ते सर्वसमावेशक होते सर्व जाती धर्मियांचे होते हे आता इथल्या तरुणांना आता समजते हिंदू कोड बिल, कामगारांच्या रजा , समान काम समान वेतन ,निवृत्ती वेतन ,प्रसूती रजा, भाक्रा नांगल धरण ,रिझर्व बँक स्थापना .धर्माच्या आधारावर ज्या राष्ट्राची निर्मिती झाली त्यांचे अस्तित्व आज धोक्यात आले आहे मात्र विविध जाती धर्मांनी परंपरांनी नटलेला भारत आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे दिमाखात उभा आहे बाबासाहेबांनी सर्वांनाच एक मूलमंत्र दिला आहे शिका संघटित व्हा अन्यायाविरुद्ध संघर्ष करा उजाड राणी किमया केलीस मोठी भीमा तुझ प्रणाम कोटी कोटी
या कार्यक्रम प्रसंगी भाऊराव धोंगडे, गंगाराम पोखरकर,रघुनाथ मेंगाळ, संतोष भांगरे, कृष्णा वर्पे, सलालकर सर, बाळासाहेब डगळे,संजय ठोकळ, विठ्ठल फटांगरे, अशोक जाधव, विश्वास पोखरकर, हेमंत बेनके, गोसावी सर मोहन वैष्णव, मंगेश औटी उपस्थित होते
सूत्रसंचालन तुकाराम कोरडे व आभार आप्पासाहेब दरेकर यांनी मानले