अहमदनगर
शनिशिंगणापुरात दोन लाखाहून भाविकांचे शनिदर्शन

सोनई-[ विजय खंडागळे]
आज शनिवारी दि.३० एप्रिल २०२२रोजी १०० वर्षांनंतर सूर्यग्रहण व शनिअमावस्या एकाच दिवशी येण्याचा योगायोग १०० वर्षांनी घडत असताना सर्वत्र उष्णतेचा पारा तब्बल ४४ अंश सेल्सिअस च्या पुढे असतानाही शनिशिंगणापूरात दोन लाखाऊन अधिक भाविकांनी शनिदर्शन घेतले
दरम्यान या संयोगाचा सर्व राशीवर प्रभाव पडणार असल्याचे अभ्यासकांचे मत आहे.वर्षातील पाहिले सूर्यग्रहण आज शनिवार ( दि.३० एप्रिल) रोजी मेष राशीत होणार आहे. या सोबतच शनिअमावस्यचा योग जुळून आला . हा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जात असल्याने प्रचंड प्रमाणात भाविकांची गर्दी होईल अशी अपेक्षा होती, मात्र उन्हामुळे भाविकांना या दर्शनाचा लाभ घेता आला नाही.
दिवसभरात सकाळी व सायंकाळी बऱ्यापैकी गर्दी केल्याने रांगा तयार करण्यात आल्या होत्या. भाविक शनिमस्तक होऊन दर्शन घेत होते
मंदिर परिसरात व चौथरा ठिकाणी फुलांची सजावट केलेली होती. पहाटे माजी.खा.चंद्रकांत खैरे, उद्योजक साखरे,उद्योजक दिल्ली चे मेहथानी, उद्योजक प्रदीप बन्सल,सौरभ बोरा( नगर),यांच्या हस्ते तर दुपारी झिम्बाब्वेचे जयेश शहा यांच्या उपस्थितीत तर सायंकाळी शनिभक्त राहुल हेगडे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.शनिवार असल्याने शनिभाविकाची व स्थानिक परिसरातील नागरिक,राज्यातील भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.अनेकांनी मिठाईचे, स्टेशनरी, पूजेचे साहित्य,प्रसाद,आदी दुकाने थाटली होती.देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर,उपाध्यक्ष विकास बानकर, सरचिटणीस आप्पासाहेब शेटे,प्रा.शिवाजी शेटे,पोपटराव कुऱ्हाट, छभुराव भूतकर, बाळासाहेब बोरुडे, नितीन शेटे,पत्रकार विजय खंडागळे,कार्यकारी अधिकारी जी.के.दरंदले,व्यवस्थापक संजय बानकर,आदी सुविधा उपलब्ध करण्यासाठी परीश्रम घेत होते.
प्रवेशद्वार, मंदिरपरिसर,शनिचौथर्या ठिकाणी विद्यतूत रोषणाई, आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. ठीक ठिकाणी भाविकांना प्रसादाचे शनिभक्तांकडून वाटप करण्यात येत होते.
भावी गर्दी लक्षात घेता जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील,शेवंगावचे विभागीय अप्पर पोलीस अधीक्षक सुदर्शन मुंढे,श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर,यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि.रामचंद्र कर्पे यांनी बंदोबस्त तैनात ठेवला होता. या वेळी एन.सी.सी.चे विद्यार्थ्यांनी महत्वाची भूमिका पार पाडली.
दिवसभरात अनेक मान्यवरांनी विधिवत पूजा करून शनिदर्शन घेतले.
पदाधिकारी ,कार्यकारी अधिकारी जी.के.दरदले हे व्यवस्था वर लक्ष ठेऊन होते.विशेष अतिथीचा सन्मान कार्यकारी अधिकारी जी.के.दरदले, व उपकार्यकरी अधिकारी नितीन शेटे हे करत होते.दिवसभर भाविकांचा ओघ चालू होता. शनिअमावस्य यात्रा शांततेत पार पडली.
पहील्यांदाच पार्किंग मंदिरा लगत
यापूर्वी यात्रेसाठी २/३ की.मी.अंतरावर वाहने लावून पायी चालत चालत यावे लागत होते, पण या यात्रेला चारी दिशेने पार्किंग व्यवस्था मंदिरा लगत केल्याने भाविकांना सुखद अनुभव मिळाला.
