अहमदनगरपर्यटन

कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यात वन्यजीव विभागा ने केली प्राणी व पक्षांची प्रगणंना !

संजय महानोर

भंडारदरा / प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यात या वर्षी बौद्ध पोर्णिमेच्या दिवशी वन्यजीव विभागाकडुन प्राणी व पक्षांची प्रगणंना करण्यात आली असुन या प्रगणनेत वेगवेगळ्या प्रकारच्या प्राणी व पक्षांचा अधिवास अद्यापही टिकुन असल्याचे दिसुन आले .
अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या लगत असलेल्या कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यात दरवर्षी प्रमाणे याही वर्षी बौद्ध पोर्णिमेच्या दिवशी प्राणी व पक्षांची वन्यजीव विभागाकडुन प्रगणना करण्यात आली .या प्रगणनेसाठी वन्यजीव विभागाकडुन प्रगणननेसाठी पाणवठ्यांचा वापर केला जातो .त्यासाठी वन्यप्राण्यांच्या निरिक्षणासाठी पाणवठ्यालगतच झाडांवर निरिक्षण मनोरे उभारले जातात . यावर्षी वन्यप्राण्या प्रगणनेसाठी वन्यजीव विभागाचे अधिकारी , कर्मचारी तसेच पुणे , अहमदनगर व नासिक विभागातुन वेगवेगळ्या काॅलेजच्या विद्यार्थ्यांनीही सहभाग नोंदविला होता .प्रगणनेसाठी कोलटेंभे , रतनवाडी , साम्रद , घाटघर , उडदावणे , पांजरे , शिंगणवाडी या परिसरातील पाणवठ्यांवर निरीक्षणासाठी मनोरे उभारण्यात आले होते . बौद्ध पोर्णिमेच्या दिवशी स्वच्छ चंद्राचा प्रकाश असल्याने पाणवठ्यावर पाणी पिण्यासाठी आलेल्या वन्यप्राण्यांचे छायचित्र घेण्यात येऊन नोंदणी करण्यात आली .
भंडारद-याच्या अभयारण्यात वानर , खार , ससा , रानमांजर , तरस , माकड , मुंगुस , रानडुक्कर , भेकर , कोल्हा , रानगवा , निलगाय , सांबर , शेकरु व बिबट्या हे प्राणी दिसुन आले असुन पक्षांमध्ये बगळा , लावरी , खंड्या , साळुंकी , कुंभार कुकडा , होला , घुबड , रानकोंबडी , रानतांबी , मोर , रानकोंबडा , कोकरुस , फेसा , पाणकोंबडी , केगई व ईतर अनेक पक्षी दिसुन आले . यामध्ये अभयारण्यामध्ये बिबट्यांचा सहवास अल्पप्रमाणात दिसुन येत असुन फक्त ४ बिबट्यांची नोंद झाली आहे .तर १ रानगवाही गेल्या दोन तीन वर्षापासुन अभारण्यात मुक्कामास असल्याचे लक्षात येत आहे . वानर व माकड यांचा जंगलात मोठ्या प्रमाणात वास्तव्य असुन प्रगणेनत अनुक्रमे वानरांची संख्या २८१ अशी आहे तर माकडे २१३ असल्याचे लक्षात आले .रानडक्करांचाही मोठ्या प्रमाणात अधिवास असल्याचे लक्षात येत आहे . तसेच रतनवाडी परीसरात निलगाय व सांबर टिकुन असुन शेकरुही जंगलात वास्तव्यास आहेत . पक्षांचांही अभयारण्यात मोठ्याप्रमाणात वावर असल्याचे प्रगनणेवरुन लक्षात येत असुन चिमणी मात्र अभयारण्यातुन गायब झाली असल्याचे लक्षात येते . या वन्यजीवांच्या प्रगणनेसाठी वनसंरक्षक अधिकारी यशवंत केसकर , वनसंरक्षक अधिकारी गणेश रणदिवे , वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल आडे , डाॅ. डी वाय पाटील विद्यालयाचे प्राचार्य डाॅ.मोहन वामण ,वनपाल रविंद्र सोनार , भाऊसाहेब मुठे , तसेच वनकर्मचारी चंद्रकांत तळपाडे, महिंद्रा पाटील , सरोदे ताई , संजय गिते ,गुलाब दिवे यांच्यासह ईतर कर्मचा-यांचीही उपस्थिती होती .

वन्यजिव प्रगगणनेसाठी वन्यजीव विभागाने असे मनोरे उभारण्यात आले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button