समनापुर येथे होळकरांनी बांधलेल्या त्या बारावे वरील अतिक्रमण हटविले!

संगमनेर प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यातील समनापुर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या बारवे वर अतिक्रमण झाले होते हे अतिक्रमण तातडीने हटवावे अन्यथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे घराला घेराव घालू असा इशारा देण्यात आला होता यानंतर अखेर प्रशासनाने त्याची दखल घेत हे अतिक्रमण हटविले
अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर असताना संगमनेर तालुक्यातील समनापूर येथील ग्रामस्थांनी राष्ट्रीय समाज पक्ष युवा जोडो संकल्प अभियान बैठकीत येऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या बारवेवर अतिक्रमण हटविण्याची तक्रार अनेक वेळा प्रशासनाकडे केली होती तरी कोणतीही दखल घेतली जात नव्हती
त्यावर आपण आवाज उठवावा अशी मागणी रासप कडे केली होती. सदर बैठकी नंतर सर्वांना घेऊन तहसीलदार कार्यलयात जाऊन निवेदन दिले होते १५ मे २०२२ पर्यँत अतिक्रमण हटवल नाही तर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या घराला घेराव घालू असाराष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने सय्यद बाबा शेख,अजित पाटील,स संभाजी खेमनर नामदेव काशीद बाबासाहेव जुंधारे यांनी इशारा दिला होता प्रशासनाने याची दखल घेऊन अतिक्रमण हटवले. त्याबद्दल रासपच्या वतीने बारव खुली करून दिल्या बद्दल प्रशासनाचे आभार मानले