म्हसोबा झाप सेवा सोसायटी चेअरमन पदी संतोष गुंजाळ तर व्हा. चेअरमन पदी बाळू आहेर

दत्ता ठुबे
पारनेर प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या म्हसोबाझाप सेवा सोसायटीची निवडणूक दोन महिन्यापूर्वी पार पडली होती शिवसेना नेते, जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषी समितीचे सभापती काशिनाथ दाते सर यांना मानणारे सर्वच तेरा संचालक निवडून आले होते व या सोसायटीवर शिवसेनेने वर्चस्व कायम राखले होते
शनिवार दिनांक २१ मे २०२२ रोजी मा. जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी यांचेकडील अधि सूचना प्रमाणे म्हसोबाझाप विकास सहकारी सेवा सोसायटी चेअरमन व व्हाईस चेअरमन यांची निवड श्री. ए. सी. रोहोकले सहाय्यक सहकार अधिकारी पारनेर यांचे अध्यक्षतेखाली सकाळी ११ वाजता संस्थेचे कार्यालय येथे आयोजित केली होती यावेळी संस्थेच्या चेअरमन पदासाठी संतोष रंगनाथ गुंजाळ व व्हाईस चेअरमन पदासाठी बाळू पोपट आहेर यांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केले व इतर कोणताही अर्ज न आल्याने निवड अविरोध झाल्याचे अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आले संतोष रंगनाथ गुंजाळ यांना सुचक विपुल भाऊसाहेब शिंदे अनुमोदक तुकाराम रामदास आहेर होते तर बाळू पोपट आहेर यांना सूचक दत्तात्रय रंगनाथ घाडगे अनुमोदक अक्षय कचरू खैरे हे होते यावेळी संचालक तुकाराम आहेर, जालिंदर आहेर, बाळू आहेर, दत्तात्रेय घाडगे, रावसाहेब निमसे, विपुल शिंदे, अक्षय खैरे, रंजना उमाप,वैभव गुंजाळ, संतोष भालके, आशा शिंदे, संस्थेचे सचिव श्री. भा. दा. महांडुळे उपस्थित होते
सभापती काशिनाथ दाते सर यांच्या विचाराने म्हसोबाचा सोसायटीमध्ये शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त फायदा कसा होईल कर्जवितरण जास्तीत जास्त कसे करतात येईल यासाठी काम करणार असून आगामी काळात दाते सरांच्या मागे खंबीरपणे उभे राहणार :
संतोष गुंजाळ, चेअरमन म्हसोबा झाप
डॉ. प्रदीप दाते , संघटक दिपक उंडे, शिवसेना शाखा प्रमुख प्रकाश घाडगे, रंगनाथ दाते, माजी चेअरमन रोहीदास गुंजाळ,मा. उपसरपंच भाऊसाहेब आहेर, जयसिंग आग्रे, संतोष गुंजाळ, खंडू गुंजाळ, बाळू गुंजाळ, शिवाजी गुंजाळ, अशोक गुंजाळ, रामदास गुंजाळ, बाळु गणपत शिंदे, भानुदास हांडे, संकेत गुंजाळ, बाळासाहेब गुंजाळ, तान्हाजी दाते, कृष्णा गुंजाळ, विकास दाते, संतोष शिंदे, बाळू हांडे, प्रदीप गुंजाळ, विकास आहेर , गोविंद आग्रे, भानुदास आहेर, किरण शिंदे, बाळु गुंजाळ, बाळू आहेर, निवृत्ती आहेर, सुधीर दाते, कचरू खैरे, गोरख गुंजाळ इत्यादी मान्यवर उपस्थित होते

नवनिर्वाचित चेअरमन, व्हा. चेअरमन यांचे तालुक्याचे माजी आमदार विजय औटी, जिल्हा परिषदेचे बांधकाम समिती सभापती काशिनाथ दाते सर, शिवसेना जिल्हा उपप्रमुख रामदास भोसले, महिला आघाडी प्रमुख प्रियंका ताई खिलारी, तालुकाप्रमुख विकास रोहोकले, युवा सेना तालुका प्रमुख नितीन शेळके यांनी अभिनंदन केले आहे