किन्ही-बहिरोबावाडी सोसायटीच्या चेअरमनपदी त्रिंबकराव मुळे तर व्हा.चेअरमनपदी शंकर व्यवहारे यांची वर्णी !

माजी शिक्षकांना राजकीय प्रवाहात आणण्याचा आ.निलेश लंके यांनी दिलेला शब्द ठरवला खरा !
दत्ता ठुबे
पारनेर प्रतिनिधी :
तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या किन्ही – बहिरोबावाडी वि.कार्यकारी से.सोसायटिच्या चेअरमन, व्हा.चेअरमन पदांची निवडणुक ३ मे रोजी पार पडली.
चेअरमनपदी माजी शिक्षक ञिंबकराव साहेबराव मुळे व व्हा.चेअरमनपदी बहिरोबावाडी येथील शंकर बहिरू व्यवहारे यांची बिनविरोध निवड झाली. त्या पार्श्वभूमीवर रविवारी सकाळी हंगा येथे पारनेर – नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेशजी लंके यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा व संचालकांचा सत्कार करण्यात आला
.या दरम्यान बोलताना आ.निलेश लंके यांनी सांगितले की, मी काहि दिवसांपूर्वी एका कार्यक्रमादरम्यान जाहिर आश्वासन दिले होते की , मी भविष्यात तालुक्यातील माजी शिक्षकांना राजकीय प्रवाहात आणील आणि ते आश्वासन आज किन्ही – बहिरोबावाडी येथील माझ्या कार्यकर्त्यांनी एका माजी शिक्षकाला चेअरमनपदी संधी देऊन पाळल्याबद्दल मला मनस्वी आनंद झाला असुन , माझ्या कार्यकर्त्यांचा मला याबद्दल अभिमान वाटतो असे गौरवोद्गार यादरम्यान आ.लंकें यांनी काढले.तसेच किन्ही – बहिरोबावाडी वि.का.सोसायटिच्या इमारतीसाठी दहा लक्ष रुपये निधी लवकरात लवकर उपलब्ध करून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या वेळी शेतकरी नेते अनिल देठे पाटील, उद्योजक चंद्रकांत खोडदे , नवनिर्वाचित संचालक दिलीप जनार्दन खोडदे , सखाराम खोडदे , विजय रामचंद्र औटी, सुभाष खोडदे , भिमाजी पवार , अमोल केसकर, शिवाजी देवराम खोडदे , माजी सरपंच बाबासाहेब व्यवहारे, प्रा.संजय खोडदे सर , आदिनाथ व्यवहारे, प्रा.कैलास निमसे सर , अविनाश देशमुख , बापु व्यवहारे , बाळासाहेब शिंदे , भिकाजी व्यवहारे , माणिक खोडदे , सतिष मुळे , रामभाऊ साकुरे आदी उपस्थित होते.
वि.का.से.सोसायटिच्या निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रणित सद्गुरू ओंकारबाबा परिवर्तन जय किसान पॅनलने सभासदांना जे , जे आश्वासनं दिलेले होते त्यापैकी एक सर्वात महत्त्वाचे संस्थेच्या इमारतीसाठी निधी उपलब्ध करून देऊ ते आश्वासन पारनेर – नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेशजी लंके साहेबांच्या माध्यमातुन लवकारत लवकर पुर्ण होणार असुन , आ.निलेश लंके यांनी संस्थेच्या इमारतीसाठी दहा लक्ष रुपये निधी उपलब्ध करून देणार असल्याचा शब्द आज आम्हाला दिल्याने अम्हि सर्वजण आमदार निलेशजी लंके यांचे ॠणी आहोत.अनिल देठे पाटील ( शेतकरी नेते )
चंद्रकांत खोडदे ( संचालक वि.का.संस्था )