शेंडी येथील विद्यालयाचा दहावीचा १०० टक्के निकाल

जिवलग मैत्रिणींचा प्रथम क्रमांक
अकोले/ प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील शेंडी येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा दहावीच्या परिक्षेचा १०० % लागला असुन विद्यालयात कु ॠतुराणी संजय महानोर व कु. दिक्षा सुनिल सोनवणे या जिवलग मैत्रीणींनी समान गुण मिळवत विद्यालयात प्रथम येण्याचा मान मिळविला आहे
नुकताच दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असुन आदिवासी भागातही निकालाची पंरपंरा कायम राखत परिसरातील सर्व शाळांचा निकाल १००% लागला आहे .त्यामध्ये शेंडी येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय , शेंडी या विद्यालयाचा दहावीच्या परीक्षेचा निकाल १००% लागला . या विद्यालयात कु ॠतुराणी संजय महानोर व कु. दिक्षा सुनिल सोनवणे या विद्यार्थींनी समान गुण मिळवत विद्यालयात प्रथम येण्याचा मान मिळविला . दोघींना परिक्षेत ८७.८८% गुण मिळाले .
विद्यालयात कु संध्या मारुती लोटे ८७.६०% गुण मिळवत द्वितीय तर कु .दिक्षा शंकर सोनवणे हिने ८६.२० % गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळविला .तेजस संतोष वाघमारे याला ८६ % मार्क मिळाले असुन विद्यालयात चौथ्या क्रमांकावर आला आहे . परिक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचे शेंडी येथील राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते अशोकराव भांगरे , जि .प सदस्या सौ. सुनिताताई भांगरे , शेंडीचे सरपंच दिलीप भांगरे , विद्यालयाचे प्राचार्य दिलीप रोंगटे , पर्यवेक्षक रसिदा निसार व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंदांनी अभिनंदनांचा वर्षाव केला आहे .
———