राजूर च्या ॲड.एम.एन. देशमुख महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन संपन्न

विलास तुपे
राजूर प्रतिनिधी
” आजच्या धकाधकीच्या काळात ताणतणाव, जीवन शैलीतील बदल व वाढती व्यसनाधीनता यामुळे आयुर्मान घटत चालले आहे. यावर उपाय म्हणून योगा चे महत्व अधिक आहे .योगासने करून विविध आजारातून बरे झालेल्या अनेक व्यक्ती आहेत.भारतीय साधुसंतांची योगशक्ती ही जगाला मिळालेली देणगी आहे. आदर्श जीवनशैलीचे संपूर्ण सार योगा मध्ये आहे.असे विचार योग प्रशिक्षक श्री.गोविंद पवार यांनी व्यक्त केले.
ते उच्च व तंत्रशिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य, व महाविद्यालयातील विद्यार्थी कल्याण मंडळ व राष्ट्रीय सेवा योजना यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भाऊसाहेब देशमुख या वेळी उपस्थित होते.”अष्टांग योग म्हणजेच-यम,नियम, आसन,प्राणायाम, प्रत्याहार,धारणा,ध्यान, समाधी याचं पालन केलं तर अनेक फायदे मिळतात. त्याचप्रमाणे रोज नियमित योगाचा सराव केल्याने शरीर ताजे तवाने राहते.” असेही विचार त्यांनी यावेळी व्यक्त केले

. आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. भाऊसाहेब देशमुख म्हणाले की,” शरीराची दुरूस्ती व्यायाम केल्याने होते. परंतु मनाच्या मशागतीसाठी योगा ची आवश्यकता असते.तन आणि मन यास जोडणारा मार्ग म्हणजे योगा आहे. योगामुळे स्मरणशक्तीत वाढ,संयम, रागावर नियंत्रण व विचार शक्ती, अशी विविध फायदे मिळतात.यासाठी नियमितपणे योगासन करणे ही सवय लावून घेणे आवश्यक आहे. योगा विषयी जागृती होण्यासाठी शिक्षण क्रमात देखील योग हा विषय अंतर्भूत करण्याची आवश्यकता आहे ” या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयातील विद्यार्थी कल्याण मंडळाचे प्रमुख प्रा. तेलोरे यांनी केले. महाविद्यालयाच्या वतीने प्रमुख अतिथीचा सत्कार यावेळी करण्यात आला. योग प्रशिक्षक श्री गोविंद पवार यांनी यावेळी प्रत्यक्ष योगासने करून घेतली. व विविध योगासना विषयी माहिती सांगितली. या योगासन कार्यक्रमात महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रम प्रसंगी डॉ.व्ही.एन.गिते, डॉ.करंडे पी.टी, डॉ. टपळे बी.के, डॉ.सोनवणे आर.आर, प्रा.आरोटे जे.डी, डॉ.एम.बी.शिंदे, प्रा.कडलग एस.डी, प्रा.शिंदे एस.बी, डॉ.आर डी ननावरे, प्रा.व्ही.बी.नवले, प्रा.व्ही.बी.येलमामे, प्रा.थोरात बी.के. प्रा.काकडे के.जे, श्री. देशमुख आर.एम.व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार प्रा.आरोटे जे.डी यांनी मानले.