
शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
समाजातील लोकांच्या वेदनांना फुंकर घालण्याचे काम साहित्य करते आणि नवोदितांना संधी देण्याचे काम शब्दगंध करते,त्यामुळे शब्दगंध यापुढे ही साहीत्य क्षेत्रात नवी झळाळी उमटवेल असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य भाषा सल्लागार समिती चे सदस्य तथा मसाप पुणे चे विभागीय कार्यवाह जयंत येलूलकर यांनी केले.
शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने झालेल्या सत्कार समारंभ व दिनदर्शिका प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते.अध्यक्ष राजेंद्र उदागे यांच्या अध्यक्षतेखाली कोहिनूर मंगल कार्यालयात कोरोना प्रतिबंध नियम पळून झालेल्या या कार्यक्रमास जेष्ठ कवी चंद्रकांत पालवे,ज्ञानदेव पांडुळे मामा,प्रा.मेधाताई काळे,प्राचार्य जी.पी.ढाकणे,प्रा.मधुसूदन मुळे, संस्थापक सुनील गोसावी, भगवान राऊत आदी विचारपिठावर उपस्थित होते.
पुढे बोलताना येलूलकर म्हणाले कि, शब्दगंध नेहमीच प्रतिभा शोधणाऱ्या नवोदितांसाठी प्रामाणिकपणे काम करते,ही चांगली बाब आहे,
ज्ञानदेव पांडुळे म्हणाले,साहित्य हे समाजाला आरसा दाखविण्याचे काम करते,शब्दगंध नेहमीच नवनवीन उपक्रमात अग्रेसर असते,नगरकराना यांचा अभिमान आहे,
चंद्रकांत पालवे म्हणाले,कवितेच्या प्रसव वेदना तिव्र असतात,त्या नवोदितांना जागृत करतात,नवोदितांसाठी सुरू झालेल्या या साहित्यिक परिषदे मध्ये आता अनेकजण मान्यवर झाले आहेत,ही अभिमानाची बाब आहे.
औरंगाबाद येथील शाहिर प्रा.डॉ.शेषराव पठाडे म्हणाले की,शब्दगंध च्या पाठपुराव्यामुळे मला लोककलेत पी एच डी करता आली,या प्रोत्साहनामुळे मराठवाडयातील सर्व शहरामध्ये शब्दगंध च्या शाखा सुरू करण्यात येतील.
यावेळी प्रा.मेधाताई काळे,प्राचार्य जी पी ढाकणे,प्रा.मधुसूदन मुळे, माध्यमिक शिक्षक बँकेचे चेअरमन सुरेश मिसाळ,नेवासा तालुकाध्यक्ष डॉ.किशोर धनवटे,शेवंगाव तालुकाध्यक्ष हरिभाऊ नजन,राहुरी च्या कार्याध्यक्ष जयश्री झरेकर यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी शब्दगंध च्या दिनदर्शिका चे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले,मराठी भाषा सल्लागार समितीचे सदस्य म्हणून नियुक्ती बद्दल जयंत येलूलकर यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील गोसावी यांनी केले,भगवान राऊत यांनी स्वागत केले,प्रा.शर्मिला गोसावी यांनी सूत्रसंचालन केले तर शेवटी राजेंद्र फंड यांनी आभार मानले.
कार्यक्रमास विठ्ठल सोनवणे,कृष्णकांत लोणे,वसंत डबाळे,ऋता ठाकुर, ओमप्रकाश देडगे,शहाराम आगळे,देविदास आगरखं,मारुती सावंत,सुनीलकुमार धस,स्वाती ठुबे,रामकिसन माने,डॉ तुकाराम गोंदकर, डॉ गुंफा कोकाटे,अजयकुमार पवार,कवी सुभाष सोनवणे,शाहिर भारत गाडेकर,प्रा डॉ अशोक कानडे,बबनराव गिरी,अशोक गायकवाड, मनीषा गोसावी, प्रा डॉ राजाराम सोनवणे यांच्यासह निवडक ५० प्रतिनिधी उपस्थित होते.