माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचे प्रत्येक क्षेत्रातील काम आदर्शवत – हर्षवर्धन पाटील

अकोले प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यामध्ये आमदर ,मंत्री विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी ज्या ज्या क्षेत्रांमध्ये त्यांनी जे जे काम केले ते निश्चितच आदर्शवत आहे असे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी म्हटले आहे त्यांनी राजूर (ता अकोले अहमदनगर/अहिलंयनगर ) येथे पिचड कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी भेट दिली असता त्यांनी स्व मधुकरराव पिचड यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
.आमच्या समोर विरोधी पक्ष नेते म्हणून ते असताना त्यांनी आम्हा सर्व तरुण राज्यमंत्री म्हणून आम्हाला मार्गदर्शन केले. आणि त्याबरोबर दुग्ध व्यवसायाचे आणि निळवंडे धरणाचे शिल्पकार म्हणून त्यांचा उल्लेख केला पाहिजे. त्यांचे चिरंजीव वैभव पिचड व आम्ही सर्वजण बरोबर आहोत .आम्ही इथून पुढच्या काळामध्ये आमच्याकडून जे काही सहकार्य लागेल ते निश्चितपणाने केलं जाईल आणि त्यांचे जे अपूर्ण कार्य राहिलेले आहे. ते पूर्ण करण्यासाठी निश्चित मदत करू.

आमच्यासमोर विरोधी पक्ष नेते म्हणून असायचे आणि त्या काळामध्ये आम्हाला त्यांनी त्यांच्या दालना मध्ये बोलून घेतलं आणि सांगितलं तुम्ही तरुण मुलं आता विधानसभे मध्ये आलेला त्यामुळे विधानसभे मधलं, विधिमंडळातलं कामकाज, प्रशासन, मंत्री राज्यमंत्री असतात त्या खात्याच्या कामाचा संदर्भातला अनुभव घ्या अशा प्रकारचे खूप चांगलं त्यांनी मार्गदर्शन केलं. साहेबांनी विशेष करून सहकार क्षेत्र मध्ये, प्रशासनामध्ये आणि त्याचबरोबर अनंतराव थोपटे आणि पिचड साहेब यांनी दुग्ध व्यवसाय महाराष्ट्र उभा केला.
आदिवासी भागात दूध योजनाचा महापूर एक – दोन – तीन अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये आणले , आणि ज्या महाराष्ट्र मध्ये कुठे एक लिटर दूध नसायचं त्या महाराष्ट्रामध्ये महानंदासारखी संस्था स्थापन केली ,जिल्ह्याचा दूध संघ केला,तालुका दूध संघ उभा राहिला,गावोगावी दूध डेअऱ्या उभ्या राहिल्या, त्यातून गोरगरीब लोकांना एक व्यवसाय मिळाला. त्याचबरोबर आदिवासी भागांमध्ये काम पाहिल्यानंतर खऱ्या अर्थाने शिल्पकार म्हणून त्यांचा उल्लेख केला पाहिजे. भविष्यात वैभवराव यांना निश्चितपणाने सहकार्य केले जाईल आणि माजी मंत्री पिचड यांचे जे अपूर्ण कार्य राहिलेले ते पूर्ण करण्यासाठी सर्वांनी पिचड कुटुंबाच्या पाठीमागे राहू अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

काल श्रीरामपूरच्या माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक, माजी आमदार लहू कानडे , महानंदा चे माजी चेअरमन राजेश परजणे,शहापूर आमदार दौलत दरोडा, आमदार अमोल खताळ,संदीप गणेश नाईक,राजेंद्र नागवडे, प्रकाश पाटील यांनीही पिचड,कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले
————