अहमदनगर

अकोले तालुक्यात अंगणवाडयाना निकृष्ट दर्जाचा माल!

अकोले /प्रतिनिधी

अकोले तालुक्यातील अंगणवाडीला पुरवला जाणारा गहू निकृष्ट दर्जाचा आला असल्याची तक्रार ग्राहक पंचायत चे जिल्हा उपाध्यक्ष मच्छिंद्र मंडलिक यांनी म्हटले आहे

त्यांनी याबाबत बालविकास प्रकल्प अधिकारी भाऊसाहेब हाके यांना निवेदन दिले आहे .


कोरोनाचा काळ कमी झाल्यामुळे अंगणवाडीत मुले यायला लागली त्यांना पोषण आहार देण्यात येतो तोच पुरवठा ठेकेदाराने खराब निकृष्ट गहू पुरवठा केला आहे.गेले आठ ते पंधरा दिवस झाले पुरवठादाराने माल पुरवठा केला आहे. एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प अधिकारी अकोले भाऊसाहेब हाके व राजुर प्रकल्प अधिकारी भारती साताळकर यांना माहिती विचारली असता किती अंगणवाडी केंद्रावर माल गहू त्यांनी उडवाउडवीचे उत्तर दिले की अजून पर्यवेक्षिका (सुपरवायझरने) माहिती दिली नाही ती मिळाल्यावर सांगू. तसेच अंगणवाडी सेविकांना एकतर मानधन कमी गॅस टाकी भरण्यासाठी 1000 ते 1100 रुपये लागतात. प्रत्यक्षमात्र एका मुला मागे 65 पैसे मिळतात. गॅस टाकी भरण्यासाठी एवढे पैसे आणायचे कोठून. तांदूळ, हरभरा, गहू, मसूर, चनाडाळ, गूळ, तेल, हळद पावडर, मिरची पावडर इत्यादी कच्चा कोरड आहार पुरवला जातो. संबंधित ठेकेदार; ट्रक मधील वजनकाट्यावर मोजू दिला जातो, परंतु माल देताना .येथेही वजनात काटा मारतात. बऱ्याच वेळा तांदुळाचा व गव्हाचा कट्टा वजन न करता दिला जातो. त्यामुळे वजन योग्य आहे की नाही हे जाणून घेतात त्याच्या स्वाक्षऱ्या घेतल्या जातात.वरील हे ग्राहक पंचायतने अकोले व राजूर या अधिकाऱ्यांना पत्र देऊन निदर्शनास यापूर्वीही आणून दिले. पण त्याकडहीे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे असल्याचे ग्राहकपंचायतचे जिल्हा उपाध्यक्ष मच्छिंद्र मंडलिक,रमेश राक्षे ,राम रुद्रे ,ज्ञानेश्वर पुंडे, संजय लोखंडे, अशोक उघडे, गंगाराम धिंदळे, ज्ञानेश्वर बांडे, बाळासाहेब वाजे, भाऊसाहेब तळेकर, रामहारी तिकांडे, भाऊसाहेब गोर्डे, भास्कर सदगीर, कैलास तळेकर, रामदास पांडे, दत्ता ताजणे, भाऊसाहेब वाकचौरे, यांनी सांगितले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button