शेंडी येथील आरोग्य केंद्राचा आदिवासींना आधार — डॉ.जयराम खंडालवाल

अकोले /प्रतिनिधी
-जनजाती कल्याण आश्रम आरोग्य केंद्र शेंडी येथे येणाऱ्या रुग्णांची तपासणी माफक दरात केले जाईल. याचा सर्व सामान्य रुग्णाच्या फायदा होईल.या आरोग्य केंद्रामुळे परिसरातील आदिवासी बांधवासाठी मोठा आधार मिळणार असे प्रतिपादन कल्याण आश्रमाचे व शेंडी आरोग्य केंद्राचे पालक डॉ.जयराम खंडालवाल यांनी केले.
जनजाती कल्याण आश्रम , महाराष्ट्र या संस्थेद्वारे शेंडी येथे दैनंदिन रुग्ण तपासणी आरोग्य सेवा केंद्र उद्घाटन समारंभ प्रसंगी ते बोलत होते.
हे आरोग्य केंद्र सुरु व्हावे म्हणून परिसरातील आदिवासी बांधवा कडूनच सातत्याने मागणी केली जात होती. संस्थेचे हे रुग्ण सेवा केंद्र चालवण्यासाठी डॉ. हनुमंत खंडागळे व डॉ.सौ अनुजा खंडागळे हे पूर्णवेळ शेंडी आरोग्य केंद्रात उपलब्ध झाल्याने या केंद्राच्या मार्फत विविध आरोग्य विषयक उपक्रम राबवता येतील.त्याचा फायदा परिसरातील रुग्ण बालक ,महिला किशोरी वयीन युवती यांना मिळेल असे प्रतिपादन जनजाती कल्याण आश्रम महाराष्ट्र प्रांत सचिव शरद शेळके यांनी केले.
अकोले तालुक्यात एकूण शंभर आरोग्य रक्षक जनजाती कल्याण आश्रमाच्या माध्यमातून आदिवासी वाडी पाडावर आदिवासी बांधवांसाठी प्राथमिक उपचार केंद्र कार्यरत आहेत. आरोग्य रक्षक अपोपल्या गावात व वाडीत रुग्ण सेवा सेवा भाव या वृत्तीने करत आहेत. असे प्रतिपादन कल्याण आश्रमाचे पश्चिम क्षेत्र आरोग्य रक्षक आयाम, प्रमुख साहेबराव जगताप यांनी केले
. या कार्यक्रमात संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थितीत होते. कल्याण आश्रमाचे प्रांत सचिव शरद शेळके , कल्याण आश्रमाचे प्रांत संघटन मंत्री जयराम चौधरी , कल्याण आश्रमाचे प्रांत हित रक्षा प्रमुख युवराज लांडे तसेच कल्याण आश्रमाचे उत्तर नगर जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब मुळे दक्षिण नगर जिल्हा अध्यक्ष महेंद्र जाखटे जिल्हा कोषाध्यक्ष वैभव व्यवहारे, दक्षिण नगर जिल्हा सचिव डॉ. नीलकंठ ठाकरे , रामदास सोनवणे व उत्तर नगर जिल्हा संघटन मंत्री शिवदास पाडवी , आदि मान्यवर उपस्थितीत होते. या कार्यक्रमाचे नियोजन उत्तर नगर जिल्हा संघटन मंत्री शिवदास पाडवी यांनी केले . तर सूत्र संचालन व आभार डॉ. नीलकंठ ठाकरे यांनी केले .