अहमदनगर
फिनोलेक्ससाठी पोपट पवार यांचे मार्गदर्शन

सोनई–जागतिक स्तरावर कार्यरत असलेली फिनोलेक्स कंपनीने शेती क्षेत्रातील आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती, त्यामध्ये पद्मश्री पोपटराव पवार यांनी शेतकऱ्यांच्या विविध शेती उपयोगी वस्तूची विक्री होणारे शेतकरी करिता ग्रामीण भागातील विविध क्षेत्रांमध्ये सामाजिक काम करणार असल्याचे मत पद्मश्री पोपट पवार यांनी व्यक्त केले.
पवार पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या मार्गदर्शन मेळाव्यात बोलत होते.
या वेळी व्यवस्थापक संचालक अनिल राभी, यांचा सत्कार पोपटराव पवार यांनी केला.
पवार म्हणाले,आज शिक्षण,- आरोग्य,जलव्यवस्थापन, पाणी-माती परीक्षण, दुग्ध व्यवसाय, आर्थिक मागासलेल्या भागात शेती उपयोगी अवजारे,साखळी बंधारे,पिण्याचे पाणी, नियोजन, झाडे लावा,झाडे जगवा,आदी विषयावर सुमारे दीड तास पवार यांनी मार्गदर्शन केले.
या बैठीकेचे आयोजन शनिशिंगणापूर चे पोलीस पाटील ऍड.सायराम बानकर यांनी केले होते. भविष्यात फिनोलेक्स क. चे वरिष्ठ उच्च स्तरीय अधिकारी आदर्श गाव हिवरे बाजार येथे येऊन भेट देणार असून तेथील प्रत्येक्ष कामाची माहिती घेणार आहेत.
या उपक्रमामुळे महाराष्ट्रातील अल्पभूधारक, मध्यम शेतकरी, यांना याचा लाभ होईल असे पवार यांनी सांगितले.
या प्रसंगी विक्री विभागाचे व्यवस्थापक प्रदीप वेडूला, महाराष्ट्र चे प्रमुख विश्वजित हारगुडे, बबलू मोकळे,ऍड.सायराम बानकर,प्रा.दीपक काजळे, उद्योजक गोखले इन्स्टिट्यूट पुणे, व बाळासाहेब काळे उपस्थित होते.