भातकुडगाव फाटा परिसरात पीक पंचनामे सुरू

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
यंदा सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यामध्ये जिल्ह्यासह तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकाचे मोठे नुकसान झाल्याने हातात तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळे हिरवल्याने शेतकरी वर्ग आर्थिक दृष्ट्या संकटात सापडला आहे.
सततच्या पावसामुळे कपाशी बाजरी, भुईमूग, सोयाबीन सह फुलोऱ्यात आलेल्या तूरीला देखील अतिवृष्टीचा फटका बसल्यामुळे पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यात परतीच्या पावसाने आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पिकांचे झालेले नुकसानी पंचनामे करण्यासाठी शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करण्याकरिता शेवगाव तालुक्यातील महसूल व कृषी विभागामार्फत अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाणी करून करण्याचे काम सध्या युद्ध पातळीवर चालू आहे.
तालुक्यातील भायगाव येथील शिवारातील मोजे देवटाकळी सजेचे कामगार तलाठी प्रदीप मगर, मुक्तार शेख कृषी सहाय्यक श्रीराम चव्हाण, भायगाव ग्रामपंचायतच्या ग्रामविकास अधिकारी शन्नोबी जैन्नुद्दीन शेख
यांनी हरिभाऊ लक्ष्मण पवार यांच्या गट नंबर २४६ मधील कपाशी पिकाची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा करण्यात आला.यावेळी हरिभाऊ पवार, दत्तू आगळे, शिवाजी उभेदळ, रामेश्वर उभेदळ, आजिनाथ आगळे, नवनाथ आगळे, पत्रकार शहाराम आगळे यांच्यासह आदी शेतकरी हजर होते.
महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गेल्या आठवड्यापूर्वी अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांची शेतात जाऊन पाणी केली त्यावेळी शेवगाव तालुक्यातील पूर्व भागाच्या दौऱ्या दरम्यान अतिवृष्टीने जिल्ह्यात शेवगाव तालुक्यातील खरीप पिकाचे सर्वाधिक नुकसान झाल्याचे स्पष्टोती दिली होती.