
आमदार लंके यांचा पुढाकार! अंध संघटनेला ५१ हजाराची मदत !
दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी :
निलेश लंकेच्या डोक्यावर पवार साहेबांचा व कुटुंबियांचा हात आहे सरकार कोणाचेही असो आपण काही कच्चा गुरुचा चेला नाही सरकार कुणाचे असो वा येवो आपली कामे अडणार नाही त्यामुळे विरोधी पक्षनेते नामदार अजित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्याला विकास कामांसाठी मदत करतील असा आशावाद आमदार निलेश लंके यांनी व्यक्त केला
.तर दुसरीकडे विकास कामे करण्यासाठी अजित पवार यांचा हात कुणी धरू शकत नाही.जोपर्यंत पवार कुटुंबीय आपल्या बरोबर आहे तोपर्यंत अडचण येणार नाही असे व्यक्तव्य आमदार निलेश लंके यांनी नामदार अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले.
राज्याचे विरोधी पक्ष नेते व राष्ट्रवादीचे नेते नामदार अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार निलेश लंके प्रतिष्ठान व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी १६५ गरजू व होतकरू आदिवासी विद्यार्थ्यांना सायकल वाटप केले आहे. तसेच ५० शाळा मधील विद्यार्थ्यांना १५ हजार वह्या व पाच हजार पेनचे वाटप यावेळी करण्यात आले. त्याचबरोबर २ हजार ५०० शेतकऱ्यांना वृक्ष वाटप केले जाणार असून याचबरोबर गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप सुद्धा केले जाणार असल्याची माहिती आमदार निलेश लंके यांनी दिली. पारनेर येथील आमदार निलेश लंकेच्या जनसंपर्क कार्यासमोर शुक्रवारी या विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा केला आहे.
यावेळी आमदार निलेश लंके यांच्यासह जिल्हाउपाध्यक्ष अर्जुन भालेकर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे अशोक सावंत भागुजी झावरे सुदाम पवार राजेंद्र चौधरी कारभारी पोटघन मेजर दादा शिंदे दिपक लंके युवा नेते जितेश सरडे बाळासाहेब खिलारी प्रभाकर शेठ कवाद माजी सरपंच ठकाराम लंके ज्येष्ठ नेते किसनराव रासकर वसंतराव कवाद डॉ बाळासाहेब खोडदे नगराध्यक्ष विजुभाऊ औटी उपनगराध्यक्ष सुरेखा भालेकर सभापती नितीन आडसुळ डॉ बाळासाहेब कावरे सरपंच सचिन पठारे बाळासाहेब नगरे माजी सभापती गंगाराम बेलकर सभापती योगेश मते विजय भास्कर औटी नगरसेवक भूषण शेलार डॉ सचिन औटी अशोक चेडे श्रीकांत चौरे सुभाष शिंदे महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष सुवर्णाताई धाडगे तालुकाध्यक्ष पूनम मुंगसे पाकीजा शेख महिला कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष सविता ढवळे वैंजयंता मते मयुरीऔटी दिपाली औटी सरपंच सुवर्ण आहेर नाणीबाई बोरुडे कविताताई लंके सिमा पवार संपदा उनवणे युवक उपजिल्हाध्यक्ष अक्षय चेडे
बबलू रोहकले अनिल गंधाक्ते अरुण पवार विजय डोळ चेअरमन बाळासाहेब पुंडे सरपंच प्रकाश गाजरे डॉ सादिक राजे प्रितेश पानमंद नारायण साठे हरिभाऊ जाधव दत्ताभाऊ कोरडे अशोक गायकवाड दौलत गांगड किशोर यादव विपुल सावंत संदीप भागवत बंडू गायकवाड चंद्रकांत ठुबे मुकुंदा शिंदे संदीप सालके बाजीराव कारखिले बाळासाहेब दिघे फिरोज भाई हवलदार विनायक शेळके संदीप चौधरी विजय दिवटे सरपंच गुंडा भाऊ भोसले रवींद्र राजदेव भाऊ साठे बंटी दाते संदिप वाघमारे अमोल पवार सत्यम निमसे चंद्रकांत मोढवे अमोल उगले दत्तात्रय साळुंके डॉ बाबासाहेब गांगड रावसाहेब बर्वे दत्तात्रय जगदाळे अमित जाधव यांच्यासह ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .
यावेळी आमदार निलेश लंके म्हणाले की गेल्या दोन वर्षांपासून नामदार अजित पवार साहेबांच्या वाढदिवसाला सामाजिक उपक्रमाची जोड दिली आहे.दरवर्षी काही तरी केले पाहिजे या उदात्त हेतूने अजित दादा पवार यांचा वाढदिवस साजरा करत असतो.गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा व साहित्य उपलब्ध करून दिले पाहिजे गावोगावी विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.पुढारी म्हणून गावात काम असताना शैक्षणिक सुविधा पुरविल्या पाहिजे.शाळेच्या कामकाजात जास्त लक्ष घालून काम करणार आहे.माझ्या पगारातील बहुतांश हिस्सा शैक्षणिक साहित्यासह इतर सामाजिक उपक्रम करण्यासाठी खर्च झाला आहे.तर अनेक वेळा पोटाला चिमटा घेऊन कधी कधी आम्ही पण डिझेलला महाग असतो
त्यामुळे समाजातील वंचित व उपेक्षित घटकांसाठी काम करत आहे. सामाजिक विकास कामाबरोबरच वैयक्तिक प्रश्नांना प्राधान्य दिले पाहिजे.गोरगरीबांच्या वैयक्तिक अडचणी सोडविण्यासाठी व मदत केली पाहिजे असे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे.कार्यकर्त्यांनी स्थानिक पातळीवर उतरून काम केले पाहिजे . सामाजिक कामाची व गोरगरीब जनतेची ताकद माझ्या पाठीमागे आहे.त्यामुळे शैक्षणिक आरोग्य व सामाजिक उपक्रम राबवुन काम केले पाहिजे अशी अपेक्षा आमदार निलेश लंके यांनी व्यक्त केली आहे.गेल्या तीन वर्षापासून सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवून आमदार निलेश लंके आपल्या मतदार संघांमध्ये नामदार अजित दादा पवार यांचा वाढदिवस साजरा केला आहे. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनींना शिक्षण घेण्यासाठी अनेक किलोमीटर पायपीट करावे लागते त्यामुळे या १६५ आदिवासी गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस व लंके प्रतिष्ठान व निलेश लंके महीला कल्याणकारी संस्थेच्या वतीने वाढदिवसाच्या औचित्य साधून आमदार निलेश लंके व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सायकल वाटप केले आहे. तसेच पर्यावरण संवर्धन व संगोपणासाठी हा उपक्रम राबविला आहे. २ हजार ५०० शेतकऱ्यांना या पावसाळ्यात वृक्ष वाटप करून वृक्ष संवर्धन संदेश दिला आहे.
– राष्ट्रीय दृष्टीहीन अंध संघटनेला प्रतिष्ठानच्या वतीने ५१ हजार रुपयांचा धनादेश
राज्याचे विरोधी पक्षनेते नामदार अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नगर येथील अंध संघटनेला आमदार निलेश लंके प्रतिष्ठानच्या ५१ हजार रुपयांचा धनादेश राष्ट्रीय दृष्टीहीन संघटनेच्या वतीने संभाजी भोर यांना देण्यात आला आहे.अंध संघटनेला आमदार निलेश लंके यांनी जी मदत दिली आहे ती आमच्या दृष्टीने लाखमोलाची असल्याचे संभाजी भोर म्हणाले