अकोले महसूल क्षेत्रातील मंडलाधिकारी श्रीनिवास आव्हाड यांचा सन्मान

अकोले प्रतिनिधी —
महसूल दिनी अकोले महसूल क्षेत्रातील साकीरवाडी मंडलाचे मंडलाधिकारी श्रीनिवास आव्हाड यांचा १ ऑगस्ट २०२१ ते ३१ जुलै २०२२ या कार्यकाळात उत्कृष्ट मंडलाधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारीडॉ.शशिकांत मंगरुळे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
काल सोमवार १ ऑगस्ट रोजी महसूल दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील उत्कृष्ट महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले व पद्मश्री पोपटराव पवार यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला. याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी सोनप्पा यमगर, अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, विठ्ठल बुलबुले, निवृत्त कर्नल आर व्ही धुमाळ आदी उपस्थित होते.
यावेळी १ ऑगस्ट २०२१ ते ३१ जुलै २०२२ या कार्यकाळात उत्कृष्ट कार्य केलेल्या महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये जिल्ह्यात संगमनेर उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांची उपजिल्हाधिकारी संवर्गात उत्कृष्ट काम केल्याबद्दल सन्मान करण्यात आला.तर अकोले तहसिल क्षेत्रातील साकीरवाडी मंडलाचे मंडलाधिकारी श्रीनिवास आव्हाड यांना उत्कृष्ट मंडलाधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी डॉ.शशिकांत मंगरुळ यांचे हस्ते संगमनेर येथे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संगमनेर तहसीलदार अमोल निकम यांनी तर आभार अकोले तहसीलदार सतिष थेटे यांनी मानले.
श्रीनिवास आव्हाड मंडलाधिकारी यांना उत्कृष्ट मंडलाधिकारी म्हणून पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे मित्रपरिवार, नातेवाईक व सर्व क्षेत्रातील मान्यवरांकडुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
चौकट- श्रीनिवास आव्हाड यांना सुगाव खुर्द येथे कामगार तलाठी म्हणून कार्यरत असताना उत्कृष्ट तलाठी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. व पुन्हा एकदा अकोले तालुक्यात उत्कृष्ट मंडलाधिकारी म्हणून पुरस्काराने ते सन्मानित झालेले आहे.