मातोश्री मीराताई आहेर फार्मसीचा उत्कृष्ट निकाल

संस्थेने उत्कृष्ट निकालाची परंपरा जपली!

पारनेर प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यातील कर्जुले हर्या येथील मातोश्री मीराताई आहेर कॉलेज ऑफ फार्मसीचा प्रथम व द्वितीय वर्षाचा निकाल १०० टक्के लागला आहे. निकालाची उज्ज्वल परंपरा कायम ठेवली असल्याची माहिती संस्थेचे सचिव किरण आहेर व कार्याध्यक्ष डॉ. दीपक आहेर यांनी दिली.
डी. फार्मसी प्रथम व द्वितीय वर्षांचा निकाल १०० टक्के लागला. डी. फार्मसी प्रथम वर्ष विभागातून प्रथम प्रियंका तरू (८२.९०), द्वितीय विशाल टेके (७५.१०), तृतीय कृष्णा कोतकर (७४.५०), द्वितीय वर्ष विभागातून प्रथम अनिल जंजिरे (८१.९०), द्वितीय प्रियंका गागरे (८१.९०), तृतीय सोनसिंग राठोड (७५.९०) गुण मिळवून उत्तीर्ण झाले. या विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा मीराबाई आहेर, सचिव किरण आहेर, कार्याध्यक्ष डॉ. दीपक आहेर, बाळासाहेब उंडे, शीतल आहेर, प्राचार्य डॉ. वाकळे विजयकुमार, प्रा. वैभव कदम, सुभाष भाईक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.
..