इतर

ढवळपुरी येथे विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण

ग्रामपंचायतींनी उत्पन्न वाढविल्यास गावचा विकास होईल : सभापती काशिनाथ दाते सर

दत्ता ठुबे
पारनेर प्रतिनिधी
ढवळपुरी ता. पारनेर येथे पंचायत समिती सदस्य ताराबाई चौधरी यांचे निधीतून ९.२० लक्ष रुपये कामांचे भूमिपूजन व लोकार्पण जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषी समिती सभापती काशिनाथ दाते सर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे तालुकाप्रमुख विकास रोहोकले होते पंचायत समिती सदस्य ताराबाई चौधरी प्रमुख उपस्थितीत होत्या. यामध्ये श्री विठ्ठल मंदिर परिसर सुशोभीकरण करणे – ३ लक्ष, ढवळपुरी गावठाण येथे जलशुद्धीकरण यंत्र बसवणे – २.२० लक्ष, सानिटायझर मशीन वाटप करणे – २ लक्ष, कुटेवाडी येथील म्हसोबाचा ओढा मोरीपूल बांधकाम करणे – २ लक्ष

यावेळी बोलताना सभापती दाते म्हणाले कोविड काळात अतिशय कमी निधी मिळाला परंतु जिल्ह्याच्या बांधकाम समितीच्या माध्यमातून काम करताना तालुक्यात कोट्यावधीचा निधी आणला. माझ्या टाकळी ढोकेश्वर गटातील नव्हे तर संपूर्ण तालुक्यातून कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार निधी देण्याचा प्रयत्न केला. सरपंच डॉ. राजेश भनगडे यांनी मागणी केल्याप्रमाणे नागरिक सुविधा योजने अंतर्गत ग्रामपंचायत परिसर सुशोभीकरण करणे करिता २० लक्ष, पशु वैद्यकीय दवाखाना संरक्षण भिंत बांधण्यासाठी १० लक्ष, इजिमा- १०० ते दरेकर वस्ती रस्ता (ग्रामा- २५७) मजबुतीकरण व डांबरीकरण करणे १५ लक्ष असा ४५ लक्ष रुपयांचा निधी विकासासाठी दिला. या गणात पंचायत समिती सदस्य अतिशय कार्यक्षम आहे शांत, संयमी त्यांचा स्वभाव आहे. त्या कामाचा पाठपुरावा खूप करतात त्यांच्या पंचायत समितीच्या १५ वा वित्त आयोग च्या निधीतून अतिशय चांगले काम त्यांनी केले. त्यांच्या माध्यमातून या गणात अतिशय चांगले काम झाले आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आजपर्यंत इतिहासातील सर्वात जास्त निधी आणला. तालुक्यातील प्राथमिक गरजा पूर्ण करण्याचे काम आपण केले त्याचे नक्कीच समाधान आहे. जवळच्या धोत्रे गावातील मंचरे वस्ती कडे जाणारा रस्ता खूप अडचणीचा होता या रस्त्यावर ४० लक्ष रुपयांचा निधी देवुन अतिशय चांगले काम करून दिले. त्या लोकांच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून नक्कीच आनंद होतो. ढवळपुरी गावचा चेहरा बदलण्याचे काम डॉ. राजेश भनगडे यांनी केले पाच वर्षात सरपंच पद भुषविताना त्यांनी वेगवेगळ्या मार्गांनी निधी आणला. शेतकऱ्यांचे संघटन करून त्यांनी यशस्वी योजना राबवल्या. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ निर्माण करून चांगला भाव मिळवून दिला. त्यांनी दुरदृष्टी ठेवून ग्रामपंचायतीच्या जागेवर गाळे बांधून ग्रामपंचायतचे उत्पन्न वाढविले त्यात उत्पन्नातून गावचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. यापुढेही डॉ. भनगडेंच्या मागे उभे राहण्याचे आवाहन सभापती दाते यांनी केले. तुम्ही आम्हाला बोलवले आमचा मान सन्मान केला तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. यावेळी बोलताना पंचायत समिती सदस्या ताराबाई चौधरी म्हणाल्या मला तुम्ही संधी दिली. त्याचा उपयोग करून ढवळपुरी गणात माझ्या निधीतून काम करण्याचा प्रयत्न केला. या विठ्ठल मंदिरास फरशी व एक खोली करण्याचे भाग्य मला परमेश्वराने दिले आपणा सर्वांना खूप खूप धन्यवाद देते. तालुकाप्रमुख विकास रोहोकले, उद्योजक पोपटराव चौधरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले

: ढवळपुरी गावच्या विकासात सभापती दाते सरांचे मोलाचे योगदान, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्वात जास्त निधी तालुक्यात सभापती दाते सरांना आणला विकासाची दुरदृष्टी त्यांच्याकडे आहे

: डॉ. राजेश भनगडे, सरपंच ढवळपुरी

यावेळी पंचायत समिती सदस्य सौ. ताराबाई चौधरी, उद्योजक पोपटराव चौधरी, सरपंच डॉ. राजेश भनगडे, ग्राम.सदस्य पाराजी घोगरे, माजी सरपंच होनाजी घोगरे, अहमद पटेल, सुधाकर गावडे, रंगनाथ पारखे सर, सुदाम उघडे, सोन्याबापू वाव्हळ, दिपक भागवत, भाऊसाहेब आनंदकर, मच्छिंद्र व्यवहारे, वामन थोरात, नबाब शेख, बाळासाहेब कुंभकर्ण, शिवाजी जाधव, शंकर जाधव, नाथू राजापुरे, जितू थोरात, रमेश केदारी, निवृत्ती थोरात, गफुर शेख, दिनेश आव्हाड, सोन्याबापू राजापुरे, सुभाष भोंडवे, अलका चितळकर, छबुबाई थोरात, भिमबाई काकडे, इंदुबाई बिडे, जिजाबाई जाधव, ग्रामसेवक सुधाकर जाधव, कामाचे ठेकेदार सुभाष दुधाडे उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रंगनाथ पारखे यांनी केले तर आभार सरपंच राजेश भनगडे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button