सोनईत आदर्श विद्यालयाची महातिरंगा रॅली

सोनई–[ विजय खंडागळे] भारतीय स्वातंत्र्य च्या अमृत महोत्सव निमित्ताने सोनई व परिसरात ‘हर घर तिरंगा’ अंतर्गत १५ ऑगस्ट रोजी सोनई येथील आदर्श विद्या मंदिर येथे हनुमान ग्रामीण विकास व संशोधन मंडळाचे सचिव रविराज गडाख याच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी भव्य दिव्य अशी ७५ मीटर लांबीचा तिरंगा,डीजे, वेशभूषा सैनिक,ढोल ताशा,लेझीम पथक,सनई वादन, आताश बाजी,घोडेराथ, भारतमाता दर्शन,विद्यार्थी पालक,तरुण मंडळे, महिला वर्ग मोठ्या उत्साहात सहभागी होऊन गावातून फेरी काढून तिरंगा यात्रा पार पडली.
माजी खा.तुकाराम गडाख यांची प्रकृती ठीक नसल्या कारणाने उपस्थित राहू शकले नाही. मात्र त्यांच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती.निसर्गाने सुद्धा यावेळी साथ दिली. कार्यक्रम झाल्यानंतर पावसाने हजेरी लावली.
संस्थेचे सचिव रविराज गडाख,मुख्यध्यापक भाऊसाहेब खेसमाळसकर व अनिल दरंदले यांच्या शिक्षक स्टाफने अचूक नियोजन केल्याने तिरंगा फेरी जिल्ह्यात एक आकर्षक ठरत होती.
शनिशिंगणापूर येथील लोटस स्कुल मध्ये या निमित्ताने वृक्षारोपण करण्यात आले.अध्यक्ष भागवत बानकर, स.पो.नि.रामचंद्र कर्पे,ऍड.सायराम बानकर,माजी सरपंच बाळासाहेब बानकर,विश्वस्त आप्पा कुऱ्हाट, शाळेच्या बानकर मॅडम,आजी माजी पदाधिकारी सह,पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
सोनई सेवा सोसायटीच्या प्रगणात अध्यक्ष रामराव गडाख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले .यावेळी माजी अध्यक्ष विश्वास राव गडाख, उपाध्यक्षआप्पासाहेब निमसे,डॉ.गजानन दरंदले,बाबा अनारसे,सचिव वसंत बारगळ,आदी उपस्थित होते.
सोनई ग्रामपंचायत कार्यलयात सरपंच धनंजय वाघ, उपसरपंच प्रसाद हरकळे ,आदी सदस्य उपस्थितत ध्वजारोहण करण्यात आले.
यशवंत वाचनालय येथे जेष्ट नागरिक अमृत काळे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ठिक ठिकाणी हर घर तिरंगा अभियान मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले.
