इतर

नगर- पुणे महमर्गावरील घडणारे अपघात हि एक प्रकारची हत्या~ अविनाश पवार


नगर~ पुणे महामार्गवरील म्हसणे फाटा टोलनाका फोडण्याचा मनसेचा इशारा

दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी

सार्वजनिक बांधकाम विभाग आणि चेतक एंटर प्रायजेस सुपा टोलनाका याच्या मिलीभगत मुळेच नगर- पुणे रोड मुत्युचा आखाडा बनत चालला आहे असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेना पारनेर तालुक्याच्या वतीने अविनाश पवार यांनी केला आहे

माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की गेल्या महिन्या पासुन सुरु असलेल्या संततधार पावसामुळे नगर -पुणे रोड ,सुपा- पारनेर रोड तसेच महामार्गावर ठिक ठिकाणी मोठं मोठे खड्डे पडले आहेत,तसेच साइड पट्टया पुर्ण पणे उखडलेल्या आहेत.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भोंगळ कारभारामुळे तसेच चेतक एंटर प्रायजेस सुपा टोलनाका चालवणारी कंपनी फक्त टोलवसुली करुन याकडे दुर्लक्ष करत आहे.चेतक एंटर प्रायजेस व सार्वजनिक बांधकाम विभागांचे मैञी पुर्ण आर्थिक संबंध आहेत की काय याबद्दल शंका निर्माण झाली आहे .एक महिन्यापासुन नगर-पुणे रोड तसेच सुपा-पारनेर रोड वर मोठ्या संख्येने अॅक्सीडेंट होऊन अनेक निरपराध नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे अनेक कुटुंब उध्वस्त होत असताना हे झोपेचे सोंग घेऊन झोपलेले प्रशासन तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व चेतक एंटर प्रायजेस चे अधिकारी जिम्मेदार आहेत

.नगर – पुणे महामार्गावर दिशादर्शक सुचना फलक तसेच रिफ्लेक्टर बसविणे गरजेचं असताना हे जानीवपुर्वक दुर्लक्ष करत आहेत तसेच नगर पुणे रोड सुपा पुल ते गावातील चौक सुद्धा डेन्जर पाॅइंट बनला आहे. पवारवाडी घाटात रोज अॅक्सीडेंट होत आहेत तसेच हायवे वर सुद्धा कसलेही सुचना फलक अथवा अॅक्सीडेंट रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाय योजना करत नसल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पारनेरच्या निदर्शनास आले आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे नारायण गव्हाण गावातील रस्त्याचे कामं अपुर्ण असताना सुद्धा हे अधिकारी त्याकडे जानीव पुर्वक दुर्लक्ष करत आहेत तेथे सुद्धा अात्तापर्यत अनेक निरपराध नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

चेतक एंटर प्रायजेस तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकारी वर्गाला सुद्धा याबाबत अनेक संघटनांनी निवेदन देऊन मागणी करुन हे जर दुर्लक्ष करत असतील तर यांची कुठे तरी सांगड नक्कीच नाकारता येत नाही.संघटनांनी दिलेल्या निवेदनाला केराची टोपली दाखवणार असतील तर यांच्या विरोधात महामार्गावरील मुत्युस कारणीभूत धरून सदोश मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केल्या शिवाय शांत बसणार नाही आणि प्रशासनाने गुन्हा दाखल केला नाही तर मुत्यु मुखी पडणा-या कुटुंबाला जो पर्यंत सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच टोल वसुल करणारी चेतक एंटर प्रायजेस मुत्युस कारणीभूत असलेल्याने जिम्मेदारी घेऊन आर्थिक मदत करावी नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी आणि चेतक एंटर प्रायजेसच्या अधिकारी जागे करण्यासाठी नगर-पुणे रोड वरिल टोलनाका कुठल्याही क्षणी फोडणार असल्याचे अविनाश पवार यांनी प्रसिद्धी पञकाव्दारे जाहीर केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button