शेवगाव तालुक्यात राक्षी येथील स्व.मेजर सचिन साळवे यांना अखेरच्या निरोपासाठी शेवगाव तालुक्यात जनसागर उसळला!

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यातील राक्षी येथील रहिवासी मेजर सचिन रामकिसन साळवे, वय ३३ हे आसाममधील गुवाहाटी येथे नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीमध्ये गोळी लागून वीरमरण आले. आज सकाळी दहा वाजता त्यांच्यावर त्यांच्या राहत्या गावी राक्षी,ता.शेवगांव, जिल्हा अहमदनगर येथे शासकीय इंतमानात अंत्यसंस्कार करण्यात आले.सकाळी साडे आठ वाजता शेवगाव शहरातील आंबेडकर चौक येथे त्यांचे पार्थिव आले असता शेवगाव शहरातील नागरिकांनी त्यांच्या अंतिम दर्शनासाठी गर्दी केली होती.
त्यानंतर त्यांच्या राहत्या गावी राक्षी येथे त्यांचे पार्थिव नेण्यात आले.यावेळी राक्षी गाव व पंचक्रोशीतील हजारो लोक यावेळी मेजर साळवे यांच्या अंतिम दर्शनासाठी उपस्थित होते. यावेळी अमर रहे….अमर रहे च्या घोषणा देण्यात आल्या.यावेळी अतिशय भावनिक वातावरणात होते. मेजर सचिन साळवे यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राक्षी येथे झाले.महाविद्यालयीन शिक्षण शेवगाव येथे पुर्ण झाले.ते भारतीय लष्करात २०११ ला भरती झाले. त्यांच्या मागे आई-वडील, पत्नी लहान मुलगी वय ०५, दोन भाऊ असा परिवार आहे. त्यांचा लहान भाऊ राहुल साळवे हा भारतीय लष्करामध्ये नवसारा जम्मू- काश्मीरमध्ये कार्यरत आहे. यावेळी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी तसेच भारतीय लष्करातील अधिकारी, महसूलचे अधिकारी, पोलीस प्रशासनाचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
