सोनई-शनिशिंगणापूर रस्त्यावर कुत्रे करतात रास्ता रोको ?

सोनई-[ विजय खंडागळे]- ठिक ठिकाणी आपण पाहतो सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय,विविध मागण्या,आक्रोश, न्याय मिळण्यासाठी रस्ता रोको आंदोलने केली जातात,अशा वेळी संपूर्ण प्रशासनाची धावपळ असते,अशी उदाहरणे पाहतो,पण सोनई-शनिशिंगणापूर सकाळच्या वेळेला रस्त्यावर श्वानने अचानक रस्ता अडवून एक प्रकारे रस्ता रोकोच केल्याचे चित्र पहाव्याला मिळाले,
या ठिकाणची अनेकांनी फोटोशूट देखील आपल्या मोबाईल मध्ये कैद केली आहे. सेवानिवृत्त पोलीस अधीकारी शरद लिपाने यांनी. याचा हा फोटो आपल्या मोबाईल मध्ये टिपला या चित्राची सोशल मीडियात चांगलीच चर्चा रंगली आहे श्वान ने देखील आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी का बरं रस्ता अडवून धरला असेल?
यावेळी येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांनी कमालीचा वेग कमी करून आडव्या आलेल्या श्वान ला वाचवले आहे,हे मात्र नक्कीच,कारण या मार्गावर राज्यातून परराज्यातील वाहने खूप वेगात चालतात अनेक वेळा अपघात होऊन नागरिकांसह ,प्राणीचा सुध्दा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत,काही नागरिकांचा देखील अशा प्रकारच्या प्राण्यांमुळे जीव गमवावा लागला आहे.
दरम्यान अचानक श्वान (कुत्रे)ने पूर्ण रस्ता अडवल्याने अक्षरशः नागरिकांना रस्ता रोको केल्याचा अनुभव पाहायला मिळाला,हे खरे? हे चित्र कैद केले सेवानिवृत्त पोलीस अधीकारी शरद लिपाने यांनी.