इतर

मांडओहोळ धरण भरले सोमवारी आमदार निलेश लंकेच्या हस्ते होणार जलपूजन!


धरण १०० टक्के भरल्याने शेतकऱ्यांत आनंद

दत्ता ठुबे/ पारनेर प्रतिनिधी :

पारनेर तालुक्याला वरदान ठरलेले मांडओहोळ मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये चांगला पाऊस झाल्याने मांडओहळ मध्यम प्रकल्पात शनिवारी १०० टक्के भरले

. पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत सोमवार ५ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी १० वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी निलेश लंके प्रतिष्ठानचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत मांडओहोळ जलाशयाचे जलपूजन करण्यात येणार असल्याचीन माहिती म्हसोबा झापचे सरपंच प्रकाश गाजरे यांनी दिली. 

मांडओहोळ धरण भरल्याने शेतकरी वर्गासह पारनेरच्या ग्रामस्थांनमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. गणेशोत्सव काळात धरण पुर्ण क्षमतेने भरल्याने लाभक्षेत्रासह संपुर्ण पारनेर तालुक्याची तहान भागणार असल्याचे उपविभागीय अभियंता व्ही. टी. शिंदे व मांडओहळ मध्यम प्रकल्पाचे शाखा अभियंता अभिजित मोरे यांनी सांगितले.

या अगोदर सन २०१९ मध्ये वसूल २०२० मध्ये मांड ओहोळ धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. त्यानंतर आता थेट दोन वर्षांनी हे मांडओहोळ धरण ओव्हर फ्लो होणार असून पर्यटकांसाठी ते पर्वणी ठरणार आहे.मांडओहळ मध्यम प्रकल्पची एकूण साठवण क्षमता ३९९ दश लक्ष घनफुट तर उपयुक्त साठा ३१० दश लक्ष घनफुट आहे.या वर्षी पळसपूर, नांदुरपठार सावरगाव कर्जुले हर्या परिसरासह लाभक्षेत्रात चांगल्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळे धरणात आज मितीस ३९९ पैकी ३८० दशलक्ष घनफुट पाणीसाठा उपलब्ध झाला असून ऑगस्ट अखेर पुर्ण क्षमतेने भरेल असा विश्वास लाभक्षेत्रातील शेतक-यांनी व्यक्त केला होता तो अखेर खरा ठरला असून शेतक-यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.सोमवारी या जलाशयाच्या पाण्याचे पूजन पारनेर चे आमदार निलेश लंके यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. 


पारनेरच्या उत्तर भागाला वरदान ठरणारे मांडओहळ धरणातुन टाकळी ढोकेश्वरसह  कर्जुले  हर्या, वासुंदे, काताळवेडे व पठारावरील १६ गावांची कान्हुर पठार पाणीयोजना मांडओहळ धरणातून या गावांना पाणी पुरवठा होत आहे. या गावांसह तालुक्यातील जवळपास ७५ % टक्के गावांना याच मांडओहळ प्रकल्पातून टँकरने पाणीपुरवठा होत असतो.  मांडओहळ धरण पुर्ण भरल्याने पिण्याच्या पाण्यासह रब्बी हंगामातील ज्वारी, कांदा, गहू, हरबरा, वाटाणा टोमँटो आदी पिके शाश्वत मिळतील. त्यामुळे शेतकरी वर्गाच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण झाला आहे. सोमवारी आमदार  निलेश लंकेंच्या उपस्थितीत जलपूजन करण्यात येणार आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button