१० सप्टेंबरला कोरठण खंडोबा भाद्रपद पौर्णिमा उत्सव

पारनेर प्रतिनिधी
-लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थान पिंपळगावरोठा ता. पारनेर जि अहमदनगर या राज्यस्तरीय’ ब’ वर्ग तीर्थक्षेत्रावर शनिवार दि १० सप्टेंबरला भाद्रपद पौर्णिमा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ६ वा.श्री खंडोबा स्वयंभू मूर्ती मंगल स्नान ,पूजा व साजशृंगार,सकाळी ७ वा. अभिषेक महापूजा पौर्णिमा अन्नदाते यांच्या हस्ते महाआरती.नंतर सकाळी ९.३० वा. श्री खंडोबा पालखी मिरवणूक प्रदक्षिणा प्रारंभ होऊन ढोल लेझीमच्या तालावर वाजंत्री ताफ्यासह पालखी उत्सव मूर्तीसह कोरठण गडाला प्रदक्षिणा करील. विसावा देऊन लंगर विधी झाल्यावर पालखी सवाद्य मंदिर फरसावर आल्यावर अन्नदाते, भाविक पालखीला नैवेद्य अर्पण करतील नंतर पालखी मंदिरात विराजमान झाल्यावर पौर्णिमा उत्सवाचे महाप्रसाद वाटप सुरू होईल.
महादेव बबन लामखडे,सुदाम हरिभाऊ लामखडे,साधू पिराजी लामखडे,दावला बाबुराव खुटाळ सर्व राहणार मंगरुळ ता.जुन्नर., गणेश भाऊसाहेब उंडे( राहुरी) या भाविकांच्या वतीने महाप्रसाद नियोजन आहे. सर्व भाविक भक्तांनी पालखी सोहळा, देवदर्शन, महाप्रसाद यांचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थान तर्फे करण्यात आले आहे. देवस्थान तर्फे पिण्याचे पाणी, वाहने पार्किंग, दर्शन बारी नियोजन करण्यात आले