माझा पराभव करण्या करीता 2019 ला राज्य पातळीवरील नेते एकत्र झाले होते – विजयराव औटी

दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी
माझा पराभव करण्याकरीता 2019 ला राज्य पातळीवरील नेते एकत्र झाले, इतका मी डोईजड झालो होतो. याचा अर्थ समजून घ्या, माझ्यामध्ये काहीतरी आहे, यामुळे विचलित होऊ नका विचलित न होणारा कार्यकर्ता हाच खरा लोकांचा आधारस्तंभ आपण योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ. असे प्रतिपादन विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजयराव औटी यांनी केले
:-जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बुगेवाडी येथील २ शाळा खोल्या इमारत बांधणे – १८.२५, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोबलेवाडी (पुणेवाडी फाटा) संरक्षण दुरुस्त करणे व वर्ग खोल्या दुरुस्त करणे – ४ लक्ष या कामांचे भूमिपूजन/ लोकार्पण विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बांधकाम व कृषी समितीचे सभापती काशिनाथ दाते सर होते. शिवसेना तालुकाप्रमुख डॉ. श्रीकांत पठारे, शहर प्रमुख निलेश खोडदे, नगरसेवक युवराज पठारे, नवनाथ सोबले, कांतीलाल ठाणगे, राजु शेख, ऋषी गंधाडे, भाऊ ठुबे प्रमुख उपस्थितीत होते.
औटी पुढे म्हणाले की सांगोल्याचे आमदार गणपतराव देशमुख, प्रचंड उंचीचा माणूस ते विधानसभेत बोलायला लागल्यास सर्व गप्प बसून ऐकायचे आणि आता काल ते आपल्या तालुक्यात आलेले, काय ते डोंगर! हे काय चालले, आपण स्वतःची उंची कमी करून घेतो याची लोकप्रतिनिधींनी जाणिव ठेवली पाहिजे. तुम्ही सर्वांनी माझी पंधरा वर्ष माझी पाठराखण केली म्हणून मी महाराष्ट्राला माझी राजकीय उंची दाखवू शकलो, ती मी दाखवली, यामुळे माझे शत्रू वाढले पण तोअभिमान तुमचा होता पण ते सर्व दुरुस्त होणार, तुम्ही काळजी करू नका, अफवा पसरवणे, खोटी उद्घाटन करणे, सर्व मीच केले असे दाखवणे, राजकारणात वेळेची वाट बघावी लागते. सर्व आपण करू वेळ आल्यावर ठरवू देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधींचा पराभव झाला होता. लोक योग्य वेळेची वाट बघतात. ती फार लांब नाही त्यामुळे आपण एकसंघ राहूया. विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. माझे सर्व सहा नगरसेवक चांगले काम करतात
यावेळी सोबलेवाडी, पुणेवाडी फाटा शाळा येथील शिक्षक मुलांना शिकवत नाही. आमच्या पाल्यांना काही येत नाही. त्यामुळे येथील पटसंख्या कमी झालेली असून, आमच्या मुलांची गैरसोय होऊ राहिली आहे. अशी तक्रार ग्रामस्थांनी विजयराव औटी व सभापती दाते सर यांच्याकडे केली. ही बाब अतिशय गंभीर असून जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने याची दखल घेण्याची गरज आहे. सभापती दाते सर म्हणाले जिल्हा परिषदेच्या बुगेवाडी येथील दोन्ही शाळा खोल्या मीच मंजूर केले आहे. ग्रामस्थांना याची कल्पना आहे. येथील निर्लेखनही एक महिन्याच्या आत करून घेऊन दुसरी खोली मंजूर केली. मी जिल्हा परिषदेचा पदाधिकारी होतो. या दोन्ही खोल्यांचे भूमिपूजन ही आपण केले होते. त्यामुळे श्रेय कोणी घेऊ नये.
यावेळी नगरसेवक युवराज पठारे म्हणाले बुगेवाडी शाळा खोल्या सरांनी मंजूर केल्या. श्रेय दुसरेच घ्यायला लागले. हे काय आपल्याला नवीन नाही. आपल्या मंत्र्यांनी मंजूर केलेले बंधारे , मीच केले असे सांगायचे. त्यांना सवयच आहे ती! दाते सरांनी तालुक्यात विकासाचा डोंगर उभा केला. आम्ही शिवसेनेचे सर्व सातही नगरसेवक शिवसेना सोडणार नाही.
औटी साहेबांच्या व सरांच्या माध्यमातून बुगेवाडीत विकासाची कामे झाले. या प्रक्रियेत खोडा येत असतो. येथील माजी सदस्य सोशल मीडियावर मागणी पत्र टाकतो. दिशाभूल करण्याचे काम हा करतो. खोटं बोलत राहणे थांबवावे! बुगेवाडी शाळा खोल्या सरांनी मंजूर केल्या याचा साक्षीदार मी आहे. विशेष म्हणजे हा काम बंद पाडण्याचा उद्योगही हाच करत होता. बुगेवाडीकर या भुलथापांवर विश्वास ठेवत नाही
निलेश खोडदे, शिवसेना, शहर प्रमुख
बुगेवाडीच्या शाळा खोल्या करण्यासाठी सरांकडे मी ग्रामस्थांसह मागणी केली होती. पहिली खोलीचे बांधकाम चालू असताना दुसरी खोली सरांनी मंजूर केली. परंतु केविलवाना प्रकार या माजी नगरसेवकाचा झाला, खोटे बोलून ही शाळा खोली आपण पाच वर्षांपूर्वीच मागणी केली होती असे सांगू लागला. खोटे बोलत राहणे हा प्रकार आता उघड झाला आहे– नवनाथ सोबले, नगरसेवक)
यावेळी चेअरमन सखाराम बुगे, साहेबराव बुगे, रामदास कावरे, शिवाजी काळे, अनिल कावरे, शिवाजी भारती, बन्सी कावरे, संतोष थोरात, संभाजी बुगे, शरद कावरे, राजू नाईक, रामदास वाळुंज, रावसाहेब कावरे, विजय कावरे, कुंडलिक कावरे, एकनाथ थोरात, बापू बुगे, शशिकांत लोंढे, बाबजी बुगे, राहुल बुगे, लक्ष्मण बुगे, बाबुराव बुगे, दत्ता कावरे, बाबू कावरे, सुरज बुगे, किशोर मस्के, हनुमंत मस्के, आप्पा सोबले, शरद कावरे, एकनाथ थोरात, विकास सोबले, रामदास मस्के, गणेश चव्हाण, शंकर कावरे, विष्णू घुगे, सोपान देशमाने, आप्पा सोबले, विशाल सोबले, सुनील म्हस्के, भीमा औटी, सुखदेव पुजारी, शिवाजी सोबले, बाळासाहेब शेरकर, बहिरु मस्के, रामदास म्हस्के, गणेश चव्हाण, किशोर म्हस्के, सोपान देशमाने, सयाजी मस्के, विलास शेरकर, बाळू शेरकर, नरेंद्र कावरे, भानुदास कावरे, घोलप शिंदे, मंगेश कावरे, सचिन कोरडे, सुनील कावरे, रावसाहेब कावरे मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगरसेवक नवनाथ सोबले यांनी केले तर आभार सखाराम बुगे यांनी मानले.