इतर

जिल्ह्यात अवैध दारू विरुद्ध कारवाई, ६०३ ठिकाणी छापे

४९ लाखाचा मुद्देमाल जप्त!

अहमदनगर प्रतिनिधी

अवैध दारू विरुद्ध ,विशेष माहिमेअंतर्गत अहमदनगर जिल्ह्यात विविध ६०३ ठिकाणी अवैध दारु व गावठी हातभट्टी मधील ६०३ आरोपी विरुध्द कारवाई करुन ४९,३६,१९८/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन नाश करण्यात आला.

पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी गणेशोत्सव व इतर सण उत्सव अनुषंगाने दिनांक १५ ऑगस्ट, २०२२ ते दिनांक ०६ सप्टेंबर २०२२ या कालावधीत अहमदनगर जिल्ह्यातील अवैध दारु विरुध्द विशेष मोहिमेचे आयोजन कारवाई करणे बाबत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. अनिल कटके यांना आदेश दिले होते.

नमुद आदेशान्वये जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांनी आपआपले पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध दारु, गावठी हातभट्टयांचा शोध घेवुन ५४२ ठिकाणांवर छापे घातले व ५४२ आरोपींना ताब्यात घेवुन २७,०८,९१३/- ( सत्तावीस लाख आठ हजार नऊशे तेरा रुपये) रु. किं.चा मुद्देमाल जप्त करुन नाश केला.

तसेच पोनि अनिल कटके यांचे सुचना व मार्गदर्शना प्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार अशांनी मिळुन ६१ ठिकाणंवर छापले घातले व ६९ आरोपींना ताब्यात घेवुन २२,२७,२८५/- (बावीसलाख सत्तावीस हजार दोनशे पंच्याशी रुपये) रु. कि.चा जप्त व नाश केलेला मुद्देमाल असे एकुण ६०३ ठिकाणांवर छापे घातले व ६०३ आरोपींना ताब्यात घेवुन ४९, ३६, १९८/ ( एकोणपन्नास लाख छत्तीस हजार एकशे अठ्यान्नव रुपये) रु. किंचा मुद्देमाल जप्त करुन नाश करण्यात आलेला आहे.

वरील प्रमाणे कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील,अपर पोलीस अधिक्षक नगर सौरभ कुमार अगरवाल,अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर श्रीमती. स्वाती भोर,  व जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button