नूतन कला महाविद्यालयात संविधान दिन साजरा

संगमनेर दि28
नूतन कला महाविद्यालय राजापूर येथे दिनांक 26 नोव्हेंबर 2022 रोजी विद्यार्थी विकास मंडळ अंतर्गत संविधान दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य जिजाबा हासे सर उपस्थित होते. प्रमुख व्याख्याते प्राध्यापक अमोल खरात सर यांनी भारतीय संविधानामुळे महिलांना प्राप्त झालेले हक्क आणि महिलांचे समाजात निर्माण झालेले स्थान याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी आपल्या मनोगतात भारतीय संविधानाचा प्रत्येकाने अंगीकार करण्याची गरज आहे असे मत व्यक्त केले
.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मान्यवरांचे स्वागत विद्यार्थी विकासअधिकारी डॉ.प्रवीण आहेर यांनी केले.सत्कार समारंभासाठी प्रा. सुभाष वरपे तर कुमारी अनुजा घोलप हिने आभार मानले .संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी कोमल निघुते हिने केले. यावेळी संविधान उद्देश पत्रिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. तसेच संविधान दिनानिमित्त महाविद्यालयात पोस्टर व घोषवाक्य स्पर्धा घेण्यात आली.या स्पर्धेचे परीक्षण प्रा. सुभाष वर्पे प्रा. रवींद्र गोफणे डॉ. संगीता जांगिड प्रा.संतोष गोरडे यांनी केले.
सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुभाष कडलग सर तसेच सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका, विद्यार्थी , विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते