व्यंकटेश पतसंस्थाचे ठेवीदार सहकारमंत्री सावे यांच्या दरबारी

सोनई प्रतिनिधी-सोनई येथील नामांकित व्यंकटेश नागरी सहकारी पतसंस्था येथील कामकाजात संचालक व कर्मचाऱ्यांनी जवळपास दोन कोटी रुपये ची अफरातफर प्रकरणी हजारो सर्वसामान्य नागरिक ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये अडकले आहे,ते मिळण्यासाठी ठेवीदारांनी आता राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांच्याकडे धाव घेतली आहे.
ठेवीदार संजय भळगट यांनी सविस्तरपणे ठेवीदारांचे पैसे कसे खाल्ले, या मध्ये कोणकोणाचा समावेश आहे, न्यायालयाने दिलेल्या अटीवर ते कारभार करत नसल्याचे स्पष्ट सांगून अजूनही ठेवीदारांचे पैसे देऊ केले नाही,उलट वातानुकूलित दुकानात बसून आपापले व्यवसाय बिनधास्त सुरू आहे, त्यांना सर्वसामान्यचे पैश्याचे घेणे देणे आवश्यक वाटत नाही,म्हणून त्यांच्यावर तात्काळ दुबार कारवाई करण्याची मागणी पुढील काही महिन्यात शेकडो ठेवीदार घेऊन करणार आहोत, असे त्यांच्या लक्षात आणून दिले.यावर मंत्री सावे यांनी कार्यवाही करण्याचे आश्वासन ठेवीदार भळगट यांना दिले.
या ठेवीदारांचे समस्याचे गाऱ्हाणे मंत्री सावे यांच्याकडे मांडल्याने सर्व ठेवीदारांचे लक्ष लागले आहे. सावे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.