इतर

शिवसेनेला पुन्हा चांगले दिवस येणार : सभापती काशिनाथ दाते सर

दत्ता ठुबे /पारनेर प्रतिनिधी

नांदूर पठार (ता. पारनेर ) येथील जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत नांदूर पठार ते कळस रस्ता मजबुतीकरण करणे – १० लक्ष व जिल्हा परिषदेच्या पंधराव्या वित्त आयोग (टाईड) अंतर्गत गणेशवाडी येथे पिण्याच्या पाण्याची टाकी करणे – ४.२५ लक्ष या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषी समिती सभापती काशिनाथ दाते सर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख डॉ. श्रीकांत पठारे , वाघोली येथील शिवसेना शहर प्रमुख वंदना घोलप, विभाग प्रमुख अनिकेत देशमाने उपस्थित होते.
यावेळी बोलताना सभापती दाते म्हणाले तुम्हाला तुमच्या मनासारखा, औटी साहेबांच्यावर  निष्ठा असलेला, आपल्या कामावर, कर्तव्यावर निष्ठा असलेला, तालुकाप्रमुख डॉ. श्रीकांत पठारे असे व्यक्ती आहेत. कोरोनाच्या काळात अनेक क्षेत्रात अनेक लोकांनी काम केले डॉ. पठारे यांनीही पारनेर मध्ये अतिशय चांगल्या प्रकारे कोव्हिड सेंटर चालवले परंतु त्याचा कोठेही गवगवा केला नाही. अनेक रुग्णांना बरे करण्याचे पुण्य त्यांच्याकडे आहे त्यांनी यांची कुठेही प्रसिद्धी केली नाही. वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून त्यांच्याकडे अनेक लोकांशी संबंध येतो म्हणून शिवसेना पक्षाला त्यांच्या तालुकाप्रमुख पदाचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही.

सध्या आपला पक्ष अडचणीत आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांना अनेक नेते सोडून गेले परंतु आदित्यजी महाराष्ट्रभर दौरे करतायेत त्यांच्या सभेला होणारी गर्दी त्यांच्या स्वागतासाठी होणारी गर्दी पहाता तळागाळातील शिवसैनिक पक्षाबरोबर आहे हेच सांगणारी आहे. कितीही संकटे आली तरी शिवसेना ला पुन्हा चांगले दिवस येणार आहेत हे गाव शिवसेनेचे आहे पहिल्यांदा या गावात शिवसेना रुजली औटी साहेबांनी या गावात प्रचंड विकासाची कामे केली आहेत. माझ्या सभापती पदाच्या कार्यकाळात मी तालुक्यात बांधकाम समितीच्या माध्यमातून प्रचंड काम करण्याचा प्रयत्न केला त्याचाच भाग म्हणून आपल्या गावाला गणेशवाडी येथे पिण्याच्या पाण्याची टाकी आणि नांदूर पठार कडून कळस कडे जाणारा रस्ता कॉंक्रिटीकरण केला आहे. भविष्यातही आपल्या गावातील सर्व विकासकामे मार्गे लावून देईन. त्यामुळे कामाची काळजी करू नका अशी ग्वाही सभापती दाते यांनी दिली.

यावेळी नांदूर पठार येथील ग्रामस्थांनी दाते सरांकडे नांदूर पठार ते कळस रस्ता संपूर्ण डांबरीकरण करून देण्याची मागणी केली.
: निर्मळ मनाने बोलल्यास ती खरी होती, औटी साहेबांच्या पराभवानंतर सभापती दाते सरांनी तालुक्याचा विकास हाती घेतला. खऱ्या अर्थाने विकास काय असतो तो जिल्ह्याला दाखवून दिला. दाते सर राजकारणी कमी तर माणूस म्हणून सर्व गुणसंपन्न नेता आहे. नेता असावा तर दातेसरांसारखा : 

डॉ. श्रीकांत पठारे, शिवसेना तालुकाप्रमुख)


यावेळी महिला आघाडी प्रमुख सुभद्रा घोलप, नितीन आहेर, गणेश आग्रे, रंगनाथ आहेर, बाळशिराम ठुबे, श्रीकांत देशमाने, अर्जुन ठुबे, अरविंद ठुबे, विष्णू ठुबे, नवनाथ घोलप, नामदेव घोलप, शिवाजी देशमाने, दत्तात्रय देशमाने, बबन आहेर, ज्ञानेश्वर आहेर, बाळासाहेब आहेर, शुभम आहेर, दिगंबर घोलप, धनंजय महाराज वनवे, सुभाष चौधरी, माजी सरपंच लक्ष्मण देशमाने, निवृत्ती आहेर, विष्णु महाराज देशमाने, हरिभाऊ आहेर, तुकाराम आहेर, सदाशिव ठुबे, महिपती आहेर, कारभारी मेचे, शिवाजी घोलप, महेश आहेर, संजय घोलप, हरिभाऊ देशमाने, किसन देशमाने, रामदास आग्रे, अशोक घोलप, बबन घोलप, बाबाजी आहेर, बाबाजी घुले, दिनेश गाढवे, भाऊ घनदाट, बबन आग्रे, बाळू आहेर, विनायक देशमाने, कुंडलिक देशमाने, नाथा घोलप, योगेश घोलप, शरद घोलप, सुदर्शन देशमाने, गोविंद घोलप, रमेश घोलप, नवनाथ आहेर, राजेश आहेर, बाळशिराम घोलप, अनिल ठुबे, अरुण आग्रे, बाळासाहेब नेहरकर, कामाचे ठेकेदार साहेबराव नरसाळे इत्यादी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थितीत होते

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिकेत देशमाने यांनी केले तर आभार नितीन आहेर यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button