अहमदनगर

भेसळयुक्त दुधावर पाथर्डीत छापा,अन्न व औषध प्रशासनाची कारवाई!


पाथर्डी प्रतिनिधी

भेसळ अन्न व औषध प्रशासना नाने छापा टाकत पाथर्डी शहरातील वीर सावरकर मैदान येथून मे.विवेकानंद दुध संकलन केंद्र यांनी संकलित केलेले ९५० लिटर भेसळयुक्त दुध नष्ट केले अहमदनगर अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी प्रदीप कुटे यांनी ही कारवाई केली .

सोमवारी १० ऑक्टोबर २०२२ रोजी पाथर्डी येथून शेवगाव तालुका दुध संघाच्या जागेतील मे.सनफ्रेश एग्रो इंडस्ट्रीज प्रा. लि.शेवगाव ,एम.सी.सी, शेवगाव येथे अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने अचानक करण्यात आलेल्या तपासणीत विक्रीसाठी आलेल्या दुध संकलकांची तपासणी केली असता मे.विवेकानंद दुध संकलन केंद्र, विर सावरकर मैदान, पाथर्डी, मालक ज्ञानदेव शहादेव घुले यांनी तेथे विक्रीसाठी आणण्यात आलेले ९५० लिटर गाय दुध भेसळयुक्त असल्याचे संशयावरुन अन्न व औषध प्रशासनाने अन्न नमुना सदरील दुध घेउन नष्ट केले आहे. ज्ञानदेव शहादेव घुले हे अत्यंत खराब आलेल्या प्लास्टीकच्या कॅन मध्ये दुध संकलीत करुन त्याची विक्री करत होते सदर गाय दुधाची इंडीफॉस मशिनवर चाचणी केली असता त्यात साखरेचे प्रमाण असल्याचे आढळून आले व सदर दुधाची आम्लता ही वाढलेली होती असे आढळून आले सदर दुधाचा नमुना विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला असून अहवाल प्राप्त झाल्या नंतर पुढील कार्यवाही केली जाणार आहे.

मे.सनफ्रेश एग्रो इंडस्ट्रीज प्रा. लि. शेवगाव ,एमसीसी, शेवगाव या प्लँट ची तपासणी करण्यात आली असुन तेथे प्रक्रिया करण्यात आलेल्या गाय दुधाचा नमुना ही विश्लेषणासाठी घेण्यात आलेला आहे. सदरची कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी प्रदीप कुटे यांनी सहाय्यक आयुक्त संजय शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली घेतली आहे.

संकलन केंद्र चालकांनी सकाळी व संध्याकाळी दोन वेळा ताजे दुध स्वच्छ, निटनेटक्या व आरोग्यदायी वातावरणात स्टेनलेस स्टील अथवा अॅल्युमिनीयम कॅन्समध्ये दुध स्विकारुन संकलना नंतर तीन तासाचे आत शितकरण केंद्रात पोहोच होईल याची काळजी घेण्याचे व दुध शितकरण केंद्रानी दुध स्विकारताना सर्व भेसळकरी पदार्थांच्या चाचण्या घेऊनच व्यावसायीकांचे दुध स्वीकारावे व दुध भेसळीसंदर्भात काही माहीती असल्यास या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button