डाॕ.डी.वाय.पाटील महाविद्यालयाने केले ‘अमलताश’ वृक्षाचे वृक्षारोपण.

आकुर्डी ः डाॕ.डी.वाय.पाटील युनिटेक सोसायटीचे, डाॕ.डी.वाय पाटील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय,आकुर्डीच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून २६ आॕगस्ट रोजी डाॕ. डी. पाटील युनिटेक सोसायटीचे आदरणीय सचिव डाॕ. सोमनाथदादा पाटील यांच्या असलेल्या वाढदिवसाचे औचित्यसाधून २५ आॕगस्ट रोजी शेलारवाडी येथे ५१ ‘अमलाताश’ वृक्षाच्या रोपणाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे आयोजन डाॕ. डी. पाटील युनिटेक सोसायटीचे आदरणीय अध्यक्ष डाॕ. पी.डी.पाटील साहेब, उपाध्यक्षा डाॕ. भाग्यश्रीताई पाटील, विश्वस्त डाॕ. स्मिता जाधव मॕडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
यापूर्वी महाविद्यालयाने शेलावाडी येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकाच्या श्रमदानातून तीन छोटी पाण्याचे तळी बनवली होती त्याच तळ्याच्या बाजूला सर्व वृक्षाचे रोपण करण्यात आले. यानंतर प्राचार्य डाॕ. मोहन वामन सर यांनी मार्गदर्शन करताना आदरणीय डाॕ. सोमनाथदादा पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतानाच त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेतला. घोरावडेश्वर डोंगरावरती महाविद्यालयाने आजपर्यंत जे १०१ बेल, अजान , रुद्राक्ष, २०१ चाफ्यांच्या वृक्षाचे रोपण केले आहे तसेच आज जे ५१ अमलताश वृक्षाचे रोपण केले आहे त्या सर्व वृक्षाच्या संगोपनाची जबाबदारी आपण या पुढे पार पाडणार आहोत कारण सर्वांनाच सुंदर हिरव्यागार निसर्गाचा सहवास हवा असतो. आपणसुध्दा या पर्यावरणाचाच एक भाग आहोत असे मत व्यक्त केले. विद्यार्थी विकास अधिकारी डाॕ. मुकेश तिवारी यांनी आदरणीय सोमनाथ दादा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याबरोबच निसर्ग संवर्धन ही काळाजी गरज कशी आहे याविषयी मत मांडले. सूत्रसंचालन प्रा. गणेश फुंदे यांनी केले तर आभार डाॕ. मिनल भोसले यांनी मानले.
कार्यक्रमाच्या संयोजनाची जबाबदारी रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. खालिद शेख, प्रा. भागवत देशमुख, प्रा. हेमल ढगे, प्रा. मंजुषा कोठावदे, प्रा. करिष्मा सय्यद प्रा. सतिश ठाकर, प्रा. चेतन सरवदे, प्रा. बबलू नवले, प्रा.रोहित वरवडकर यांनी पार पाडली. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक प्राध्यापकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.